Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोत्यासारखे चकमतील दात, लावा ‘हे’ घरगुती दंतमंजन-दातांच्या तक्रारीवर खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 15:53 IST

ayurvedic dantamanjan recipe at home : natural dantamanjan for healthy teeth : homemade ayurvedic dantamanjan for teeth : दातांवरील पिवळा थर आणि किड होईल कायमची गायब; घरीच करा फक्त १० रुपयात औषधी, पारंपरिक दंतमंजन...

सुंदर आणि तेजस्वी हास्य प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते, पण त्यासाठी दात निरोगी असणे अत्यंत आवश्यक असते. सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये दातांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. पिवळे पडलेले दात, हिरड्यांतून रक्त येणे, दुर्गंधी, दातांची संवेदनशीलता किंवा किड अशा समस्या आता लहान वयातच दिसू लागल्या आहेत. आपले दात पांढरेशुभ्र व स्वच्छ दिसावे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचा वापर करतो. या टूथपेस्टने फक्त दात स्वच्छ केले जातात परंतु दातांच्या अनेक समस्या तशाच राहतात. बरेचदा टूथपेस्ट मधील केमिकल्समुळे दातांवरचे कवच घासले जाते आणि दात शिवशिवणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा तोंडाची दुर्गंधी अशा समस्या वाढू लागतात. यासाठीच, फार पूर्वीपासून दातांसाठी वापरले जाणारे पारंपरिक, औषधी दंतमंजन फायदेशीर ठरते(homemade ayurvedic dantamanjan for teeth).

आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या काही साध्या घरगुती पदार्थांच्या मदतीने तयार केलेले दंतमंजन दात स्वच्छ ठेवते, शिवाय हिरड्या मजबूत करते आणि तोंडातील जंतुसंसर्ग कमी (natural dantamanjan for healthy teeth) करण्यास मदत करते. नियमितपणे घरगुती व औषधी दंतमंजन वापरल्यास दातांच्या अनेक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात. तुरटी, लवंग, सैंधव मीठ यांसारख्या नैसर्गिक पदार्थांपासून घरीच शुद्ध 'दंतमंजन' कसे तयार करायचे आणि त्याचा दररोज वापर केल्यास दात मोत्यासारखे कसे चमकतील...घरच्याघरीच केमिकल फ्री दंतमंजन तयार करण्याची सोपी कृती... पूनम देवनानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील मसाला किचन या अकाउंटवरून घरगुती, औषधी दंतमंजन (ayurvedic dantamanjan recipe at home) कसे तयार करायचे याचे खास सिक्रेट शेअर केले आहे.   

पारंपरिक घरगुती, औषधी दंतमंजन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

१. लवंग - १० ते १२ काड्या २. तुरटी - १ छोटा तुकडा३. सैंधव मीठ - १ टेबलस्पून ४. जांभळाच्या पानांची पावडर - २ टेबलस्पून ५. जांभळांच्या बियांची पावडर - २ टेबलस्पून ६. त्रिफळा पावडर - १ टेबलस्पून 

घरगुती, औषधी दंतमंजन कसे तयार करावे ? 

घरगुती औषधी दंतमंजन तयार करण्यासाठी सर्वातआधी खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात लवंग काड्या, तुरटीचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ असे तिन्ही जिन्नस एकत्रित घेऊन त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. त्यानंतर, एका बाऊलमध्ये जांभळाच्या पानांची पावडर, जांभळांच्या बियांची पावडर, त्रिफळा पावडर घ्यावी त्यानंतर या मिश्रणात लवंग काड्या, तुरटीचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ त्यांची एकत्रित पूड घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावे. हे तयार दंतमंजन एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

'बॉर्डर २' फेम दिलजीत दोसांझ सांगतो, पारंपरिक पंजाबी 'विंटर सिक्रेट'! सर्दी-खोकला बरा करणारा भन्नाट उपाय...

मीठाशिवाय जेवणाला चव नाहीच, पण पाहा मिठाचे ८ अजून जादूई उपयोग-आजवर नसतील माहिती...

हे घरगुती दंतमंजन वापरण्याचे फायदे... 

१. लवंग काड्या आणि सैंधव मिठाच्या वापरामुळे हिरड्यांना येणारी सूज कमी होते. यामुळे हिरड्या मजबूत होऊन दात हलण्याची समस्या दूर होते.

२. मीठ आणि तुरटीची पावडर वापरल्याने दातांवर साचलेला पिवळा थर आणि डाग निघून जातात, ज्यामुळे दात मोत्यासारखे चमकू लागतात.

३. यामध्ये वापरली जाणारी जांभळाच्या पानांची पावडर, लवंग पावडर बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे दिवसभर श्वास ताजेतवाने राहतात आणि दुर्गंधी येत नाही. 

४. सैंधव मिठात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे दातांमधील किड वाढण्यापासून रोखतात आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवतात.

५. थंड किंवा गरम खाल्ल्यावर दात शिवशिवत असल्यास, सैंधव मीठ आणि लवंगयुक्त दंतमंजन वापरल्याने दातांच्या नसांना आराम मिळतो.

६. हिरड्यांमधून रक्त किंवा पू येण्याची समस्या (पायोरिया) घरगुती मंजनाच्या नियमित वापराने हळूहळू कमी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Tooth Powder for Sparkling Teeth and Healthy Gums

Web Summary : This article details how to make a natural tooth powder using ingredients like cloves, alum, and rock salt. This homemade remedy strengthens gums, reduces sensitivity, eliminates bad breath, and helps achieve sparkling white teeth by removing plaque and preventing cavities.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय