Join us

स्ट्रेटनिंग करताना 'या' चुकांमुळेच गळतात कसे, आलिया भटच्या हेअर स्टायलिस्टचा वाचा महत्वाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 18:10 IST

Hair Care Tips For Straightening Hair: हेअर स्ट्रेटनिंग करताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. नाहीतर केसांचं नुकसान होऊ शकतं.(avoid 2 mistakes while hair straightening or culrs)

ठळक मुद्देसेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर सांगतात की अनेक जणींना ही सवय असते की कुठेतरी बाहेर जाण्याची खूप गडबड असते. त्यामुळे मग ओले केस झटपट वाळवले जातात

अगदी स्ट्रेट असणारे सिल्की, मऊ केस सगळ्यांनाच आवडतात. पण प्रत्येकाच्याच केसांंचं टेक्स्चर तसं नसतं. त्यामुळे मग बऱ्याच जणी हेअर स्ट्रेटनिंग करतात. काही वर्षांपुवी फक्त पार्लरमध्ये जाऊनच हेअर स्ट्रेटनिंग करता यायचं. पण आता मात्र हेअर स्ट्रेटनर खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्याने अनेक जणी ते खरेदी करताना आणि घरच्याघरी जेव्हा पाहिजे तेव्हा हेअर स्ट्रेट करतात (Hair Care Tips For Straightening Hair). पण वारंवार हेअर स्ट्रेटनिंग करत असाल आणि ते करताना जर तुमच्याकडून काही चुका नेहमीच होत असतील तर त्याने केसांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं आणि केस खूप गळू शकतात, असं आलिया भट, कतरिना कैफ यासारख्या सेलिब्रिटींचे हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर सांगत आहेत.(avoid 2 mistakes while hair straightening or culrs)

 

हेअर स्ट्रेटनिंग करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्या?

सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर सांगतात की अनेक जणींना ही सवय असते की कुठेतरी बाहेर जाण्याची खूप गडबड असते. त्यामुळे मग ओले केस झटपट वाळवले जातात आणि ते तसेच अर्धवट ओले असतानाच त्यांच्यावरून गडबडीने हेअर स्ट्रेटनर फिरवला जातो.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

यामुळे हेअर स्ट्रेनमध्ये जो काही ओलसरपणा असतो त्याची उष्णतेमुळे वाफ तयार होते आणि ती केसांमधून बाहेर पडते. यालाच आपण बबल हेअर इफेक्ट असं म्हणताे. यामुळे केस ठिकठिकाणी कमकुवत, ड्राय होत जातात. कारण ओल्या केसांवर गरम स्ट्रेटनर फिरवल्याने केसांमधलं प्रोटीन स्ट्रक्चर बिघडून जातं.

 

त्यामुळे मग केस तुटतात, कोरडे पडतात, त्यांच्यातलं माॅईश्चर कमी होतं आणि लवकरच ते झाडूसारखे ड्राय, कोरडे होत जातात. यामुळे केस मुळापासून तुटण्याचं म्हणजेच केस गळण्याचं प्रमाण खूप वाढतं. 

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? वाचा खास टिप्स 

म्हणूनच केस १०० टक्के कोरडे झाल्यावरच त्यांच्यावर स्ट्रेटनिंग, कर्ल्स अशा हिटिंग ट्रिटमेंट करा. या ट्रिटमेंट करण्यापुर्वी हिटिंग प्रोटेक्शन स्प्रे वापरायला विसरू नका, असा महत्त्वाचा सल्ला अमित ठाकूर यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआलिया भट