Lokmat Sakhi >Beauty > अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair : Athiya Shetty's Hair Oil Remedy Follow : Long hair growth remedy by Athiya Shetty : Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair : अथिया शेट्टीच्या सुंदर केसांचं सिक्रेट, चमकदार, मजबूत आणि घनदाट केसांसाठी ती करते 'या' तेलाने मसाज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 14:55 IST2025-06-13T14:41:41+5:302025-06-13T14:55:24+5:30

Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair : Athiya Shetty's Hair Oil Remedy Follow : Long hair growth remedy by Athiya Shetty : Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair : अथिया शेट्टीच्या सुंदर केसांचं सिक्रेट, चमकदार, मजबूत आणि घनदाट केसांसाठी ती करते 'या' तेलाने मसाज...

Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair Long hair growth remedy by Athiya Shetty | अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

अथिया शेट्टी बॉलिवूड मधील सुपरस्टार सुनील शेट्टी यांची लेक. अथिया शेट्टी केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि सुंदर, आरोग्यदायी केसांसाठीसुद्धा (Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair) तितकीच लोकप्रिय आहे. अथिया अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याची (Athiya Shetty's Hair Oil Remedy Follow) देखील विशेष काळजी घेताना दिसते. केसांसाठी ती विशेषता घरगुती उपाय करण्यावरच अधिक भर देते. चमकदार, घनदाट आणि मजबूत केसांसाठी ती कायम घरच्याघरीच तयार केलेलं घरगुती नैसर्गिक तेल वापरते. वेगवेगळ्या मुलाखतींमधून, अथियाने आपल्याला केमिकलयुक्त महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी चक्क घरगुती नैसर्गिक उपाय करायलाच आवडतात हे सांगितले( Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair).

अथिया केसांसाठी तिच्या हेअरकेअर रुटीनमध्ये घरगुती कांद्याच्या तेलाचा वापर करते. केसगळती थांबवण्यासाठी, स्काल्पला पोषण देण्यासाठी आणि नवीन केसांची वाढ होण्यासाठी कांद्याचं तेल उपयुक्त असल्याचं ती नेहमी सांगते. त्यामुळे कांद्याचं तेल हे अथिया शेट्टीच्या सुंदर केसांचं खास सिक्रेट आहे. चमकदार, मजबूत आणि घनदाट केसांसाठी ती तेलाचा मसाज, योग्य आहार आणि हेअर केअर रुटीन फॉलो करणे या गोष्टी अगदी बारकाईने पाळतेच. अथिया केसांसाठी वापरते ते कांद्याचे तेल घरच्याघरीच कसे तयार करायचे ते पाहा. 

कांद्याचे तेल कसे करायचे ? 

अथिया शेट्टी तिच्या हेअर केअर रुटीनमध्ये घरगुती कांद्याचे तेल यापरते वापरते, या तेलाची सिक्रेट रेसिपी fitnessbestie1412 या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ कांदे आणि शुद्ध खोबरेल तेल इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. 

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर करेल जादू! तुरटीच्या फेसपॅकपासून टोनरपर्यंत त्वचेसाठी 'असा' करा वापर...

सगळ्यात आधी कांद्याची सालं काढून कांदा मध्यम आकारात चिरुन घ्यावा. त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यात चिरलेला कांदा घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता ही कांद्याची तयार पेस्ट एका पॅनमध्ये घेऊन, मध्यम आचेवर थोडी शिजवून घ्यावी. त्यानंतर कांदा शिजत आल्यावर त्यात खोबरेल तेल घालावे. आता हळुहळु चमच्याने हलवत राहावे. हे मिश्रण आटवून त्याचा रंग जोपर्यंत हलकासा चॉकलेटी ब्राऊन होत नाही तोपर्यंत ते मंद आचेवर गरम करावे. मिश्रणाचा रंग बदलला की, गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. असे थंड तेल एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावे. 

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

केसांसाठी कांद्याचे तेल लावण्याचे फायदे... 

कांद्याच्या तेलातील सल्फर हे केसांच्या मुळांना बळकटी देते आणि त्यामुळे केसगळती थांबते. याचबरोबर, कांद्याचं तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी युक्त असल्याने डोक्यातील कोंडा आणि इतर संसर्ग दूर ठेवते. स्काल्पचे रक्ताभिसरण वाढवून कांद्याचं तेल नवीन केस उगवण्यास फायदेशीर ठरते. यासोबतच, केस अधिक मऊ, चमकदार आणि रेशमी दिसतात.


Web Title: Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair Long hair growth remedy by Athiya Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.