हल्ली केसांच्या अनेक समस्यांमुळे आपण त्रस्त आहोत. केस अकाली पिकणे, गळणे, केसात कोंडा होणे किंवा केस पातळ होणे यांसारख्या समस्यांमुळे अनेकजण हैराण आहेत.(Hair care Tips) इतकेच नाही तर केसांना अनेकजण कलर करतात ज्यामुळे केसगळतीचे प्रमाण वाढते. (Hair Loss Remedies) अकाली पिकणाऱ्या केसांना नॅचरल समजून मेहंदी लावतात.(Mehndi Side Effects on Hair) केसांना रंग येण्यासाठी, स्काल्पला थंडावा मिळण्यासाठी मेहंदी लावली जाते. मेहंदी लावण्याचे अनेक फायदे जरी असले तरी केसांना यामुळे नुकसान होऊ शकते.(Natural Hair Care Tips)
ऐन तारुण्यात केस गळाल्यानं खप्पड दिसताय-टक्कल पडलं? ५ सवयी बदला-केस वाढतीलही वेगानं
1. मेहंदीमध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे केसांसाठी चांगले नसते. केसांचा ओलावा कमी झाल्याने केस कोरडे पडतात आणि निर्जीव होतात. टाळू कोरडी पडते. यामुळे केसगळतीची समस्या वाढते. ज्यांचे केस अधिक कोरडे असतात त्यांना ही समस्या जास्त प्रमाणात होते. सतत मेहंदी लावल्याने केसांची लवचिकता कमी होते. ज्यामुळे केस गळू लागतात आणि त्यांची नैसर्गिक चमक देखील नाहीशी होते.
2. बाजारात मिळणाऱ्या मेहंदीमध्ये अधिक प्रमाणात रासायनिक घटक असतात. जे आपल्या संवेदनशील त्वचेला हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे त्वचेला ऍलर्जी होणे. टाळूला खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येऊ शकतो. अनेकदा यामुळे कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस सारखा आजार देखील होऊ शकतो. ही त्वचेची समस्या असून यामुळे सूज येऊ शकते.
चेहरा-पाठीवरची चामखीळ कमी होणारा सोपा उपाय-नारळाच्या तेलात ५ गोष्टी मिसळून लावा
3. मेहंदी थंड असल्यामुळे शरीरात कफ निर्माण करते. त्यामुळे केसांना मेहंदी लावल्याने आपण आजारी पडू शकतो. रात्रभर मेहंदी लावल्याने सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवू शकतात. यासोबतच मान आणि खांद्यातही वेदना होऊ शकतात.
4. ज्यांच्या केसांचा रंग अधिक काळा किंवा गडद असेल अशा लोकांनी मेहंदी लावावी. केस तेलकट असणाऱ्यांना मेहंदी लावल्याने फायदा होतो. यामुळे केसातील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. ज्यांची टाळू खूप घाण आहे त्यांनी मेहंदी लावावी. ज्यामुळे स्कॅल्प सुधारण्यास मदत होईल. केस मजबूत करण्यासाठी मेहंदी लावण्याऐवजी आवळा, ब्राम्ही, भृंगराज, कोरफड किंवा दह्याचा हेअर पॅक लावणे चांगले ठरेल.