Join us

केसांतील डँड्रफ सतत खांद्यावर पडतो ? शाम्पू - तेल बदलूनही फरक नाही, करा व्हिनेगरचा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 16:38 IST

Apple Cider Vinegar For Dandruff, How To Use, Benefits : Apple Cider Vinegar For Dandruff : Simple Way To Use Apple Cider Vinegar for Dandruff : Dandruff Treatments and Home Remedies : केसांतील डँड्रफ काढून टाकण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा खास उपाय नेमका काय आहे, ते पाहा....

शक्यतो उन्हाळ्यामध्ये केसांत फार मोठ्या प्रमाणांत डँड्रफ होण्याची समस्या सतावते. डोक्यांत डँड्रफ झाल्याने वारंवार खाज येणे, केस गळने अशा अनेक समस्या सतावतात. डँड्रफ म्हणजेच केसांत (Apple Cider Vinegar For Dandruff, How To Use, Benefits) सतत दिसणारे पांढरे कण, डोक्यातील खाज (Apple Cider Vinegar For Dandruff) आणि स्काल्पचा कोरडेपणा यामुळे केसांचे सौंदर्य हरवून जाते. केसांत होणाऱ्या डँड्रफवर वेळीच (Simple Way To Use Apple Cider Vinegar for Dandruff) काही उपाय केले नाही तर डँड्रफ वाढतो, हा वाढलेला डँड्रफ सतत डोक्यावरुन आपल्या खांद्यावर पडतो. चारचौघात अशाप्रकारे डँड्रफ खांद्यावर पडू लागला तर काहीवेळा आपल्याला लाजिरवाणे वाटते(Dandruff Treatments and Home Remedies).

केसांतील डँड्रफचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, तेल वापरुन पाहतो परंतु याचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय करावेसे वाटतात. केसांतील डँड्रफ काढून टाकण्यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरच्या मदतीने एक खास उपाय करुन नक्की पाहू शकतो. केसांतील डँड्रफ काढून टाकण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा खास उपाय काय आहे ते पाहूयात. 

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर वापरुन केसांतील डँड्रफचे प्रमाण कसे कमी करायचे ते पाहूयात. हेअर आणि स्किन एक्सपर्ट कृतिका मोहन हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केसांतील डँड्रफ कमी करण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि पाणी इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. 

भेंडीचे पाणी केसांसाठी वरदान! कोरडेपणा- फ्रिझीनेस आणि केसगळतीवर सोप्यात सोपा असरदार उपाय...

शेवग्याच्या शेंगांचा पाला बहुगुणी! पिगमेंटेशनपासून टॅनिंगपर्यंत त्वचेच्या प्रत्येक समस्येवर असरदार फेसपॅक...

हा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये, १ टेबलस्पून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि २ टेबलस्पून पाणी घालून एकत्रित मिसळून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. हे तयार द्रावण ब्रश किंवा बोटांच्या मदतीने स्काल्पवर लावून घ्यावे. ५ ते १० मिनिटे हे द्रावण स्काल्पवर तसेच लावून ठेवावे, त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान एकदा हा उपाय केल्याने केसांतील डँड्रफचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...

डँड्रफ काढण्यासाठी हा उपाय असरदार कसा ठरतो...

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर स्कॅल्पची pH पातळी संतुलित करण्यात मदत करतो, ज्यामुळे डोक्यातील खाज आणि सोलवटून निघणारी त्वचा यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना कमी करतात आणि डेड स्किन सेल्स दूर करतात. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या हळूहळू कमी होऊ लागते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी