Join us

किती म्हातारी दिसतेय, म्हणत अनुष्का शर्माचीही लोकांनी केली टिंगल! लोक वाट्टेल ते बोलतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 18:38 IST

Anushka Sharma At Wimbledon : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली विम्बलडनच्या सामन्याला आले पण टिका मात्र अनुष्कावरच होताना दिसतेय.

अनुष्का शर्मा. सुपरस्टार. विराट कोहलीची बायको हीच काय तिची एकमेव ओळख नाही. ती स्वत: कर्तबगार आहेच. आता ती दोन लेकरांची आई आहे आणि अजूनही देखणीच दिसते. पण लंडनमध्ये (Anushka Sharma Fans Slam Post Commenting On Her Natural Appearance At Wimbledon) मंगळवारी झालेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेचा सामना पाहायला विराटसोबत आली होती. दोघेही जोकोविचला चिअर करताना दिसले. या दोघांचा फोटो सोशल मिडीयावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु या दरम्यान अनुष्काला पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोलही केले. काहींचं म्हणणं मेकअप केला नव्हता तर ती म्हातारी दिसत होती(Fans Hit Back At Trolls For Mocking Anushka Sharma's Viral Wimbledon Outing With Virat Kohli).

 पांढऱ्या रंगाचे स्ट्रक्चर्ड ब्लेझर आणि मॅचिंग टॉप, तसेच फारसा मेकअप कमी असा अनुष्काचा लूक होता. तिच्या चेहऱ्यावर थोडासा थकवाही दिसला.  तर लगेच काहींचं सुरु झालं की ती म्हातारी दिसते. तर काहींनी मात्र अशी भुमिका घेतली की दोन लेकरांची आई आहे. ती दमतही असेल. वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसतातच. ती त्या मानाने मिरवते तर लोक कोण तिला म्हातारी म्हणत टिका करणारे. महिलांकडे कायम आपण अशा जुन्या चष्म्यातूनच पाहणार का?

हे फक्त अनुष्का शर्मा पुरताच मर्यादित नसून, प्रत्येक महिलेचं आहे. लोकांना त्यांना सौंदर्याच्या चौकटीत कोंडायचेच असते.  याउलट सत्य हे आहे की, प्रत्येक वयात स्त्रीचं सौंदर्य वेगळं आणि खास असतं. चेहऱ्यावरच्या रेषा, थकवा किंवा नैसर्गिक बदल हे तिच्या आयुष्यातील अनुभवांच्या किंवा संघर्षाच्या खुणा आहेत त्यात लपवण्यासारखे काहीच नाही, तर अभिमानाने स्वीकारणे अतिशय महत्वाचे आहे. स्त्रियांना केवळ त्यांचं सौंदर्य किंवा दिसणं या एका गोष्टींवरून मोजमाप करणं बंद होणं गरजेचं आहे. 

हा प्रसंग आपल्याला असे सांगतो की, सेलिब्रिटी असो किंवा सामान्य स्त्री तिला बाळंतपणानंतर तिच्यात झालेल्या बदलांवरुन कमी अधिक प्रमाणात हिणवले जातेच. प्रत्येकाला स्वतःचं शरीर, चेहरा, वय आणि रूप यांच्याबद्दल अभिमान बाळगण्याचा हक्क आहे. आपण जसे आहोत, जसे दिसतो तसंच स्वतःला स्वीकारणं गरजेच आहे. त्यामुळे अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत, 'जब वी मेट' मधील गीत सारखं "मै अपनी फेवरिट हूं" म्हणतं हसत हसत स्वतःला स्वीकारणंच योग्य आहे...

टॅग्स :ब्यूटी टिप्सअनुष्का शर्मासोशल व्हायरलविराट कोहली