Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसांत खूप कोंडा झाला म्हणून तुरटी लावताय? 'या' पद्धतीने करा उपयोग, कोंडा नष्ट होईल मुळापासून- खाजही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2026 12:33 IST

Natural treatment for scalp infection: Alum and coconut oil for dandruff: आपल्याला केसांतील कोंडा आणि खाज यांपासून कायमची सुटका हवी असेल, तर तुरटीचा वापर करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

केसांत भरपूर कोंडा होणं ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. खराब हवामान, चुकीचा आहार आणि केसांची नीट निगा न राखल्यामुळे टाळूवर कोंडा साचू लागतो. यामुळे डोक्याला फक्त खाजच सुटत नाही तर केसगळतीचे प्रमाण देखील वाढते.(DIY anti-dandruff hair mask) केसांतील कोंडा घालवण्यासाठी आपण महागडे अँटी-डँड्रफ शाम्पू वापरुनही फारसा काही फरक पडत नाही. काही तासांच कोंडा पुन्हा दिसायला लागतो. आयुर्वेदानुसार कोंडा घालवण्यासाठी तुरटी प्रभावी उपाय आहे. (Hair Care Tips)
तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म टाळूवरील संसर्ग नष्ट करून कोंड्याला मुळापासून संपवण्यास मदत करतात. (Stop hair fall due to dandruff) पण, तुरटी सरळ केसांवर लावणे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास केसांच्या नैसर्गिक तेलाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे, जर आपल्याला केसांतील कोंडा आणि खाज यांपासून कायमची सुटका हवी असेल, तर तुरटीचा वापर करण्याची योग्य पद्धत आणि त्यासोबत घ्यावयाची काळजी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Safe use of Fitkari on hair)

साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश

1. तुरटी ही कोरडी असते. त्यामुळे ती सरळ केसांना लावल्यास केस कोरडे होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपल्याला नारळाचे तेल कोमट करुन घ्या. त्यात अर्धा चमचा बारीक केलेली तुरटीची पूड मिसळा. हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने टाळूला लावा. ३० मिनिटानंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे कोंडा निघून जाईल आणि केसांना ओलावाही मिळतो. 

2. जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर रोज वापरत असलेल्या शाम्पूमध्ये चिमूटभर तुरटी पूड मिसळा. या मिश्रणाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा. २ ते ३ मिनिटानंतर पाण्याने केस धुवा. यामुळे टाळूवरील साचलेली मृत त्वचा साफ होते. 

3. डोक्याला खूप खाज सुटत असेल तर एक ग्लास पाण्यात छोटासा तुरटीचा खडा फिरवून घ्या किंवा पाव चमचा पूड घाला. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा आणि केसांच्या मुळांवर स्प्रे करा. १५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल. 

4. केस धुतल्यानंतर अवघ्या काही वेळा पुन्हा कोंडा वर येत असेल किंवा टाळू चिकट होत असेल तर लिंबाच्या रसात थोडी तुरटी पूड मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट जिथे जास्त कोंडा आहे त्या भागावर लावा. १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे मिश्रण डोक्यावर ठेवू नका. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. 

5. तुरटीचा वापर आठवड्यातून १ ते २ वेळा करा. जास्त वापरल्यास केस राठ होऊ शकतात. आपली त्वचा संवेदनशील असेल तर उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तुरटी लावल्यानंतर केस धुताना पाण्याचा भरपूर वापर करा. तुरटीचे कण केसांत राहिल्यास टाळूला कोरडेपणा येऊ शकतो.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Use alum correctly to eliminate dandruff and reduce itching.

Web Summary : Alum's antibacterial properties treat dandruff effectively. Mix with coconut oil, shampoo, or water. Apply to the scalp, but use sparingly (1-2 times weekly) to avoid dryness. Patch test if sensitive.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी