लांब, घनदाट, काळेभोर केस कुणाला आवडणार नाहीत. केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. केस लांबसडक, दाट असावेत असे प्रत्येकीला वाटते. पण काही कारणांनी केस वाढत (2 Ingreditents to Boost Hair Growth with Coconut-Based Oils) नसतील तर आपण कधी घरगुती तर कधी पार्लरमध्ये जाऊन काही ना काही उपाय करतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या टाळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो. केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने केस खराब होण्याचा धोकाही असतो(How To Make Your Hair Grow with Coconut, Fenugreek Seeds & kalonji).
केस निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा जेवढा वापर करु तेवढे ते केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी नेहमीच्याच वापरातील खोबरेल तेलात किचनमधील दोन औषधी सिक्रेट पदार्थांचा आपण वापर करू शकतो. आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून (Home remedy for hair growth) हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि हा उपाय नेमका कसा करायचा ते पाहूयात.
केसांच्या अनेक समस्यांवर कलोंजी आणि मेथीचे दाणे आहेत असरदार...
कलोंजी आणि मेथीच्या दाण्यांचा केसांसाठी वापर करताना सर्वात आधी एका छोट्या बाऊलमध्ये खोबरेल तेल घ्यावे. त्यानंतर गॅसच्या मंद आचेवर हे खोबरेल तेल हलकेच गरम करून घ्यावे. त्यानंतर या तेलात प्रत्येकी १ टेबसलपून मेथी दाणे आणि कलोंजी घालावी.
फक्त एक चमचाभर चहा पावडरच्या पाण्याने केसांच्या समस्या होतील दूर, 'असा' करा उपयोग...
त्यानंतर या तेलाचा रंग बदलेपर्यंत हे तेल गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. तेलाचा रंग हलकासा बदलू लागल्यानंतर गॅस बंद करून हे तेल गाळणीने गाळून एका काचेच्या बाटलीत स्टोअर करून ठेवावे. मेथी दाणे आणि कलोंजीचे औषधी तेल केसांना लावण्यासाठी तयार आहे.
या तेलाचा वापर कसा करावा...
मेथी दाणे आणि कलोंजीचे औषधी तेल स्टोअर करून ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही या तेलाचा वापर कराल तेव्हा हे तेल हलकेच गरम करून घ्यावे. असे हलके गरम केलेले तेल केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत लावून घ्यावे. या तेलाने केसांना मसाज करून घ्यावा. हे तेल केसांवर तासभर किंवा संपूर्ण रात्रभर ठेवून द्यावे. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केसांवर हे तेल लावून मसाज केल्यास केसांच्या वाढीत आपल्याला चांगला फरक दिसून येतो.
आयुर्वेदातील पारंपरिक पद्धतीने करा तुपाचे नॅचरल मॉइश्चरायझर, हिवाळ्यात त्वचेच्या समस्या होतील दूर...
केसांसाठी हे तेल वापरण्याचे फायदे...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीसाठी आणि चांगले पोषण होण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. केसांतला कोंडा, रुक्षपणा, खाज, केस पांढरे होणे, केस गळणे यांसारख्या समस्यांवर खोबरेल तेल अतिशय गुणकारी ठरते.
२. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन - सी, प्रोटीन, हे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यात मदत करते. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते.
३. कलोंजी :- मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स, ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी एसिड्स, व्हिटामीन 'ए' यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे केस वाढण्यासोबतच केस मजबूत राहण्यासही मदत होते.