Join us

Rashmika Mandanna's coorgi saree: रश्मिका मंदानाच्या 'कुर्गी' स्टाइल साडीची बातच न्यारी, पाहा कशी नेसायची ही स्पेशल साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:47 IST

How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत..

ठळक मुद्देसध्या आपल्याकडे लग्नसराई सुरू आहेच.. अशावेळी जर इतरांपेक्षा काही वेगळा खास लूक करायचा असेल किंवा स्पेशल दिसायचं असेल, तर तुम्हीही अशा पद्धतीने कुर्गी साडी ट्राय करू शकता.

पुष्पा चित्रपट हिट झाला आणि रातोरात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna's coorgi saree look) घराघरांत पोहोचली. या चित्रपटाआधीही तिची लोकप्रियता होतीच.. पण जसा हा चित्रपट आला तशी ती अधिकच प्रसिद्ध झाली. तिच्या फिटनेसपासून ते तिच्या सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचीच जबरदस्त चर्चा होऊ लागली. तिच्याबद्दल जाणून घेण्यास तिचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. आता चाहत्यांना अशीच उत्सूकता तिच्या साडी नेसण्याच्या पद्धतीबाबत वाटते आहे..(saree draping style of Actress Rashmika Mandanna)

 

रश्मिका आणि तिचं साडी प्रेम तर सगळेच जाणून आहेत. नुकतीच ती पुन्हा एकदा साडीमध्ये दिसून आली. नेहमीप्रमाणे तिची साडी तर छान होतीच, शिवाय रश्मिकाही सुंदर दिसत होती. पण यासगळ्यांपेक्षा जास्त चर्चा आहे, ती साडी नेसण्याच्या तिच्या पद्धतीविषयी म्हणजेच saree draping स्टाईलविषयी. रश्मिका ज्य पद्धतीची साडी नेसली आहे, त्याला कुर्गी Coorgi किंवा कोडवा kodava पद्धत म्हणतात. ज्याप्रमाणे गुजराथी किंवा बंगाली पद्धतीने साडी नेसली जाते किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी घालतात, तशीच कुर्गी पद्धतीने नेसलेली साडी ही खास कर्नाटकी स्टाईल म्हणून ओळखली जाते.

 

कर्नाटकात कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमांमध्ये, लग्नसोहळे किंवा मग सणावाराला अशा पद्धतीनेच कुर्गी साडी नेसण्यात येते. सध्या आपल्याकडे लग्नसराई सुरू आहेच.. अशावेळी जर इतरांपेक्षा काही वेगळा खास लूक करायचा असेल किंवा स्पेशल दिसायचं असेल, तर तुम्हीही अशा पद्धतीने कुर्गी साडी ट्राय करू शकता. उंच, शिडशिडीत महिलांना अशा पद्धतीने नेसलेली साडी अधिक शोभून दिसते. या प्रकारात साडीचा पदर संपूर्ण दिसतो. त्यामुळे जर तुमच्या साडीचा पदर अधिक भरजरी असेल, तर यंदाच्या लग्नसराईत कुर्गी किंवा कोडवा साडी नक्कीच ट्राय करून बघा..

 

कशी नेसायची कुर्गी साडी? (how to drape coorgi saree?)- आपण एरवी जशी साडी नेसतो तशी आणि कुर्ग पद्धतीची साडी यातला मुख्य फरक म्हणजे साडीच्या निऱ्या.- आपण साडीच्या निऱ्या पुढच्या बाजुने खोचतो तर कुर्ग पद्धतीत साडीच्या निऱ्या बरोबर मागच्या बाजूने खोचल्या जातात.- यानंतर आपण जी साडी नेसतो तिचा पदर मोठा काढतो आणि तो डाव्या खांद्यावरून तसाच मागे साेडून देतो. पण कुर्ग पद्धतीमध्ये साडीचा डाव्या खांद्यावरून सोडलेला पदर मागच्या बाजुने ओढून उजव्या खांद्यावर आणला जातो आणि तिथे पिनअप केला जातो.- ट्रॅडिशनल कुर्गी साडी कशी नेसावी, हे सांगणारा हा व्हिडिओ

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनरश्मिका मंदानाकर्नाटक