केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जाताना आपल्याला काही घरगुती उपाय करण्याचा सल्ला अनेकांकडून मिळतो. केसांची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती तेल, कंडिशनर, शाम्पू असे विविध घटक वापरतो.(Hair care Tips) अनेकदा बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये कांदा हा केसांसाठी मुख्य घटक मानला जातो. (onion juice for hair growth tips)तेल, शाम्पू, कंडिशनर सारख्या बहुतेक गोष्टींसाठी कांदा वापरला जातो.(how to use onion juice for hair) कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये सल्फर भरपूर असते. जे केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक असते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहे.(boost hair growth naturally) ज्यामुळे कोंडा आणि केसगळतीसारख्या समस्या कमी होतात. परंतु, अनेकदा केसांना कांद्याचा रस लावून सुद्धा समस्या कमी काही होत नाही.(common mistakes in hair care) त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रितेश बजाज यांनी म्हटलं की, ९० टक्के लोकांना कांद्याचा रस कसा वापरायचा याविषयी माहित नाही. त्यामुळे केसांमध्ये त्यांना कोणताही फरक जाणवत नाही. कांद्याचा रस नवीन केस वाढवण्यास मदत करु शकतात का? याविषयी जाणून घेऊया.
केसगळतीवर स्वस्तात मस्त उपाय! खा 'हा' लाडू, मिळेल भरपूर पोषण- केसांची वाढ होईल भरभर
कांद्याचा रस नवीन केस वाढवण्यास मदत करतात आणि केस गळती थांबवतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रोज कांद्याचा रस केसांना लावल्याने त्याची वाढ होते. केस गळणे, पातळ होणे यावर कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. कांद्याच्या रसाचा उग्र वास येतो, परंतु योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा वास निघून जाईल आणि केसांसाठी फायदेशीर ठरेल.
कांद्याचा रस गाळल्यानंतर लगेच केसांना लावू नका. ३ दिवस तसाच राहू द्या. यामुळे त्यातील क्वेरसेटिनची पातळी वाढते, टाळूला पीएच सुंतलित करते. तसेच नवीन जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स तयार करते. केसांच्या कूपा सक्रिय होतात, जळजळ कमी होते. मुळांच्या पातळीपर्यंत केसांची वाढ उत्तेजित करते. इतकेच नाही तर स्कॅल्प मायक्रोबायोमचे संतुलन राखते.
कांद्याचा रस केसांना कसा लावाल?
कांद्याचा रस केसांना लावण्यापूर्वी टाळू ओली करावी. २ ते ३ मिनिटांना तयार केलेल्या कांद्याचा रसाने टाळूची मालिश करा. त्यानंतर शॉवर कॅपने केस झाका. अर्धा तासानंतर केस धुवा. नंतर शाम्पू लावून पुन्हा केस धुवा. असं ४ ते ६ आठवडे करा. एका आठवड्यात २ वेळा करा. यामुळे केसगळती थांबेल तसेच नवीन केस उगवण्यास मदत होईल.