lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > लांब - दाट केसांसाठी ७ प्रकारचे तेल; ऑनलाइन विशेष बजेटफ्रेंडली ऑफर्स

लांब - दाट केसांसाठी ७ प्रकारचे तेल; ऑनलाइन विशेष बजेटफ्रेंडली ऑफर्स

विविध गुणधर्म असलेल्या तेलांमुळे होतील केस मजबूत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:44 PM2022-01-16T17:44:54+5:302022-01-16T17:53:37+5:30

विविध गुणधर्म असलेल्या तेलांमुळे होतील केस मजबूत...

7 types of oils for long and thick hair; Online Special Budget Friendly Offers | लांब - दाट केसांसाठी ७ प्रकारचे तेल; ऑनलाइन विशेष बजेटफ्रेंडली ऑफर्स

लांब - दाट केसांसाठी ७ प्रकारचे तेल; ऑनलाइन विशेष बजेटफ्रेंडली ऑफर्स

Highlightsएकाहून एक तेलांचा वापर करा आणि केस बनवा मजबूतसौंदर्यात भर घालणारे केस लांबसडक आणि घनदाट असायला हवेत ना, मग तेलाने पोषण करायलाच हवे

प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉनने एकाहून एक भन्नाट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये केसांना लावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांवरही भरघोस सूट देण्यात आली आहे. प्रदूषण, ताण, जीवनशैली, पाण्याचा दर्जा यांमुळे केसांचा पोत बिघडतो आणि तो पुन्हा चांगला होण्यासाठी आपण एक ना अनेक उपाय करत असतो. केसगळतीमुळे तुम्ही खूप हैराण असाल आणि काय करावे हे कळत नसेल तर हा सेल तुमच्यासाठीच आहे हे लक्षात घ्या. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या केसगळतीमुळे आपण वैतागून जातो. त्यावर काय उपाय करायचा हेही अनेकदा आपल्याला कळत नाही, अशावेळी काही चांगले पर्याय समोर असतील तर... चांगले तेल लावल्यामुळे तुमचे केस दाट आणि लांबसडक होणार असतील तर एकाहून एक ऑफर्स असलेले हे तेलांचे प्रकार तुम्ही नक्कीच खरेदी करु शकता. पाहूयात चांगल्या ब्रँडची काही हेअर ऑईल जी लावल्याने तुमच्या केसांचा पोत नक्कीच सुधारेल. सध्या या तेलांवर ऑफर्स असल्याने बजेटमध्ये तुम्ही हे तेलांचे प्रकार खरेदी करु शकाल.

१.    पॅराशूट अडव्हान्स ओनियन हेअर ऑईल

पॅराशूट हा प्रसिद्ध ब्रँड आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे प्रसिद्ध आहे. केसांचे पोषण होण्यासाठी एकाहून एक दर्जेदार उत्पादने बनवण्यामध्ये पॅराशूट कंपनीचा हात कोणीही धरु शकत नाही. केस गळती आणि केस तुटण्यावर उपयुक्त असलेले ओनियन हेअर ऑइल हे पॅराशूटचे एक उत्तम उत्पादन आहे. या तेलामुळे केस लांब आणि घनदाट होण्यास मदत होते. ३९९ रुपयांचे हे हेअर ऑईल सध्या ऑफरमध्ये २९९ रुपयांना आहे. 

२.    वॉव आमला हेअर ऑईल 

आवळ्याचा गर असलेले हे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. केसांच्या मूळात सहज शोषले जाणारे हे तेल अजिबात चिपचिप आणि तेलकट नाहीये. आवळा केसांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम उपाय असल्याने या तेलामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. ३२५ रुपये किंमतीचे हे तेल सध्या २११ रुपयांना उपलब्ध आहे. 

३.    धथरी हेअर केअर प्लस ऑईल

तुम्ही केसांची चांगली वाढ व्हावी म्हणून जर केसांना हेअर मसाज करत असाल तर हे तेल उत्तम उपाय आहे. केस घनदाट आणि मजबूत होण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. तसेच केसांची चांगली वाढ होण्यासाठीही हे तेल उपयुक्त ठरते. केस गळती थांबवण्यासाठीही या तेलामध्ये उपयुक्त असे गुणधर्म आहेत. आयुर्वेदीक गुणांनी युक्त असलेले हे तेल एरवी ५२५ रुपयांना मिळते ते सध्या ऑफरमध्ये ५०९ रुपयांना उपलब्ध आहे. 

४.    ममाअर्थ ओनियन हेअर ऑईल

कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते. केस पातळ होण्यापासून वाचवण्यासाठी मूळांना हे तेल लावणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. केसांशी निगडीत सगळ्या तक्रारी दूर होण्य़ास या तेलाची चांगली मदत होते. केस मजबूत आणि चांगले होण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. ३९९ रुपयांचे हे तेल ३५८ रुपयांना उपलब्ध आहे. 

५.    इंदुलेखा भृंगराज ऑईल

आयुर्वेदातील भृंगराज ही केस गळती कमी होण्यासाठी आणि नवीन केसांची निर्मिती होण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी औषधी आहे. यातील अँटीऑक्सिडंटस आणि खनिजे यांमुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. या बाटलीच्या झाकणाला कंगवा देण्यात आला आहे, जेणेकरुन केसांना लावलेले तेल मूळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ४३० रुपयांचे हे ऑईल ऑफरमध्ये ३२४ रुपयांना मिळत आहे.

६.    केशकिंग आयुर्वेदीक हेअरऑईल

केसांच्या मूळांचा रक्तप्रवाह सुरळीत व्हावा यासाठी केशकिंग ऑईल अतिशय उपयुक्त ठरते. केसनिर्मिती करणाऱ्या घटकांना मजबूत करण्यापासून ते केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त ठरते. इतर आयुर्वेदीक तेलांपेक्षा हे तेल दुप्पट चांगले असल्याचे म्हटले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरमध्ये ३२० रुपयांचे हे तेल २४८ रुपयांना मिळत आहे. 

७.    बायोटीक बायो भृंगराज थेरापेटीक हेअर ऑईल

आवळा, गाईचे दूध, बकरीचे दूध, ब्राम्ही, मुळेथी, तेसू असे सर्व घटक या तेलात असतात. गळणाऱ्या केसांवरील उत्तम उपाय म्हणून हे तेल अतिशय उपयुक्त ठरते. खोबरेल तेलामध्ये हे सगळे घटक मिसळल्याने त्यांचे पोषणमूल्य आणखी वाढते. १५९ रुपयांचे हे तेल अवघ्या ९५ रुपयांना उपलब्ध आहे. 

Web Title: 7 types of oils for long and thick hair; Online Special Budget Friendly Offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.