Join us

केस गळणं नैसर्गिकपणे थांबेल आणि वाढतीलही भराभर, रोज ५ गोष्टी करा- केस होतील दाट, लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 12:05 IST

7 Natural Remedies for Reducing Hair Fall: केस गळण्याची समस्या मुळापासूनच कमी करायची असेल तर या काही साध्या- सोप्या गोष्टी करायला लगेचच सुरूवात करा.(7 simple tricks for long and thick hair)

ठळक मुद्देया उपायांमुळे तुमचे केस गळणं नॅचरली कमी होईल आणि त्यांची चांगली वाढ होऊन ते दाट होतील.

केस गळण्याची समस्या हल्ली जवळपास सगळ्याच वयोगटातल्या मंडळींना छळते आहे. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच केस गळत आहे. केस गळणं वाढायला लागलं की आपण शाम्पू, तेल, कंडिशनर बदलून पाहातो. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. काही जणांच्या बाबतीत तर असंही होतं की केसांवर वेगवेगळ्या केमिकल्सचा मारा झाल्यामुळे केस जास्तच गळायला लागतात (how to control hair loss?). म्हणूनच आता हे असे वरवरचे उपाय थांबवा आणि केस गळणं कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहा (7 natural remedies for reducing hair fall). या उपायांमुळे तुमचे केस गळणं नॅचरली कमी होईल आणि त्यांची चांगली वाढ होऊन ते दाट होतील.(7 simple tricks for long and thick hair)

 

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

१. तुमच्या दिवसाची सुरुवात मेथी दाण्याचं पाणी पिऊन करा. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या रात्री झोपण्यापुर्वी भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपाेटी हे पाणी प्या. मेथ्या केसांसाठी अतिशय फायदेशीर असतात.

अभ्यासासोबतच मुलांना ४ गोष्टीही शिकवा! खऱ्या आयुष्यात बनतील 'चॅम्पियन', सगळेच करतील कौतुक..

२. दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा १० मिनिटांसाठी पृथ्वी मुद्रा करा. ही मुद्रा करण्यासाठी अनामिका म्हणजेच मधले बोट आणि करंगळी यांच्यामधले बोट दुमडून घ्या आणि अंगठ्याच्या टोकाने त्यावर दाब द्या. 

 

३. रोज सकाळी १ मिनिटासाठी उष्ट्रासन करा. यामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तपुरवठा होऊन केस गळणं कमी होण्यास मदत होते.

काळसर बुरशी आलेला कांदा खाता? तज्ज्ञ सांगतात ती बुरशी नेमकी काय आणि आरोग्यावर होणारा परिणाम

४. सर्वांगासन, शिर्षासन अशा पद्धतीचे डोक्याच्या दिशेने रक्तपुरवठा वाढविणारे व्यायाम केल्यानेही केसांच्या कित्येक समस्या कमी होतो. पण अगदी पहिल्यांदाच हे व्यायाम करणार असाल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा.

 

५. २ ते ३ मिनिटांसाठी एका हाताची नखे दुसऱ्या हाताच्या नखांवर घासा. यामुळेही केसांच्या वाढीमध्ये चांगला परिणाम दिसून येतो.

प्लास्टिकच्या खुर्च्या खूपच जुनाट, मळकट दिसू लागल्या? 'या' पद्धतीने पुसा- नव्यासारख्या स्वच्छ दिसतील

६. केस मोकळे सोडा आणि दोन्ही हात केसांमध्ये घालून केस हलकेच ओढा. 

७. रोज एक मिनिटासाठी बॅक कोंम्बिंग करा. म्हणजेच खाली वाका आणि कंगवा मानेपासून कपाळापर्यंत अशा दिशेने फिरवून केस विंचरा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी