लांबसडक, घनदाट केस प्रत्येकीलाच हवे असतात पण केसांच्या समस्याच इतक्या असतात की, ही इच्छा अधुरीच राहते... केसांच्या अनेक समस्यांपैकी एक सर्वात कॉमन समस्या म्हणजे केसांची वाढ खुंटणे...अनेक उपाय करूनही केस लांब वाढत नाहीत, पातळ होतात किंवा तुटायला लागतात तेव्हा केस गळून टक्कल पडेल की काय अशीच भीती वाटते...केसांची वाढ एकदा खुंटली की, वर्षानुवर्षे केस न वाढता आहेत तितकेच राहतात...केसांची खुंटलेली ही वाढ पुन्हा व्हावी म्हणून पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च न करता आपण चक्क घरच्याघरीच दह्याचा वापर करू शकतो(curd hair masks for hair growth).
आपल्या सगळ्यांच्या फ्रिजमध्ये कायम उपलब्ध असलेलं दही केसांच्या वाढीसाठी एकदम फायदेशीर ठरतं...वर्षानुवर्षे केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने होण्यासाठी दही एक रामबाण उपाय आहे. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड स्काल्पची स्वच्छता करते, तर त्यातील प्रथिने केसांना आतून पोषण देतात. दह्यापासून तयार केलेले घरगुती हेअर मास्क (how to use curd hair mask for hair growth) केसांची खुंटलेली वाढ कमी करून त्यांना मऊ, मजबूत आणि चमकदार बनवू शकतात. 'दही' हे केवळ आरोग्यासाठीच नाही, तर केसांसाठीही एक वरदान आहे. दह्यासोबत काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण करून तयार केलेले हेअर मास्क केसांच्या मुळांना नवसंजीवनी देतात. जर तुमचे केस एका विशिष्ट लांबीनंतर वाढत नसतील, तर दह्याचे हे 'मॅजिकल' हेअर मास्क (6 curd hair masks for faster hair growth) तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतात. खुंटलेली केसांची वाढ पुन्हा सुरू करण्यासाठी दह्याचे काही खास हेअर मास्क कसे तयार करायचे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती,ते पाहूयात...
केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने होण्यासाठी हेअर मास्क..
१. दही आणि कडीपत्ता हेअर मास्क (Curd & Curry Leaves Mask) :- कडीपत्ता हा केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही, तर केसांच्या आरोग्यासाठीही एक उत्तम औषध आहे. कडीपत्त्यामध्ये 'बीटा-कॅरोटीन' आणि 'प्रोटीन' मुबलक प्रमाणात असते, जे केस गळती रोखण्यासाठी आणि मुळांना मजबुती देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अर्धा कप ताज्या दह्यामध्ये एक मूठभर कडीपत्त्याची पेस्ट मिसळा. हे मिश्रण स्काल्पवर आणि केसांच्या मुळांना नीट लावा. साधारण ३० मिनिटे हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर एखाद्या सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. कढीपत्त्यामध्ये 'बी-व्हिटॅमिन' आणि 'अँटी-ऑक्सिडंट्स' भरपूर असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात.
पोट साफ नाही, तासंतास वॉशरुममध्ये बसता? वाटीभर दही आणि गुळाचा हा उपाय एकदम असरदार...
२. दही, मध आणि लिंबू हेअर मास्क (Curd, Honey & Lemon) :- जर कोंड्यामुळे तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल, तर हा हेअर मास्क तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. लिंबाचे 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म कोंडा मुळापासून नष्ट करतात, तर मध नैसर्गिक ओलावा देऊन केसांना रेशमी आणि मऊ बनवते. एका वाटी दह्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस नीट मिसळून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांशी हलक्या हाताने लावा. साधारण २० मिनिटे ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. हा मास्क स्काल्पचा pH लेव्हल संतुलित राखण्यास मदत करतो. यामुळे केसांमधील खाज आणि कोंडा कमी होऊन मुळांना पोषण मिळते. कोरड्या आणि निस्तेज केसांमध्ये पुन्हा जिवंतपणा येतो.
३. दही आणि मेथी दाणे हेअर मास्क (Curd & Methi Dana Mask) :- केसांच्या 'री-ग्रोथ' (Re-growth) साठी मेथी दाणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मेथीमध्ये 'निकोटिनिक ॲसिड' (Nicotinic Acid) मुबलक प्रमाणात असते, जे केसांची वाढ पुन्हा सुरू करण्यास आणि नवीन केस येण्यास मदत करते. रात्रभर भिजवून ठेवलेले मेथी दाणे सकाळी मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दह्यामध्ये नीट मिसळून घ्या. हे मिश्रण स्काल्पवर लावून हलक्या हाताने मसाज करा. साधारण ४५ मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवा. हा मास्क केसांना मुळापासून मजबूती देतो. यामुळे केस गळती कमी होते आणि केसांची लांबी वेगाने वाढू लागते. केसांमधील नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी हा मास्क अत्यंत गुणकारी आहे.
इस्त्री न करताही कॉटन साडी दिसेल कडक, पाहा १० ट्रिक्स-५ मिनिटांत चुरगळललेली साडी दिसेल नवीकोरी...
४. दही आणि कोरफड हेअर मास्क (Curd & Aloe Vera Mask) :- कोरड्या आणि निस्तेज केसांची वाढ अनेकदा मध्येच थांबते. अशावेळी कोरफड जेल दह्यासोबत मिळून स्काल्पला लावल्याने स्काल्प हायड्रेट होण्याचे काम होते. ताज्या कोरफडीचा जेल आणि दही समान प्रमाणात एकत्र घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत नीट लावा. साधारण १ तास हा मास्क केसांवर राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून टाका. या मास्कमुळे केस गुंतणे कमी होते आणि केस तुटण्याचे प्रमाण निम्म्यावर येते. कोरड्या केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो, ज्यामुळे केसांची वाढ नैसर्गिकरीत्या सुरू होते.
५. दही आणि आवळा पावडर (Curd & Amla Mask) :- आवळा व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना आहे. १ कप दह्यात २ मोठे चमचे आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण केसांना लावून ४० मिनिटे ठेवा. केस पांढरे होण्यापासून वाचतात आणि केसांची थांबलेली वाढ पुन्हा होण्यास सुरुवात होते.
६. दही आणि जास्वंदाची पाने (Curd & Hibiscus Mask) :- जास्वंद हे नैसर्गिक कंडिशनिंग आणि केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. ५ ते ६ जास्वंदाची पाने आणि १ फूल वाटून घ्या, त्यात अर्धा कप दही मिसळा.पूर्ण केसांना लावून ४५ मिनिटे ठेवा. यामुळे केसांना फाटे फुटणे थांबते आणि केस लांब वाढतात.
Web Summary : Struggling with stunted hair growth? Yogurt's lactic acid cleanses the scalp and proteins nourish hair. Try homemade yogurt masks with ingredients like curry leaves, honey/lemon, fenugreek, aloe vera, amla, or hibiscus to revitalize hair follicles and boost growth naturally.
Web Summary : रुके हुए बालों के विकास से परेशान हैं? दही का लैक्टिक एसिड खोपड़ी को साफ करता है और प्रोटीन बालों को पोषण देता है। बालों के रोम को फिर से जीवंत करने और प्राकृतिक रूप से विकास को बढ़ावा देने के लिए करी पत्ते, शहद/नींबू, मेथी, एलोवेरा, आंवला या गुड़हल जैसे अवयवों के साथ घर का बना दही मास्क आज़माएं।