आपले केस दाट, लांबसडक असतील तर सहाजिकच आपल्या सौंदर्यात भर पडते. पण हेच केस रुक्ष आणि निर्जीव झाले असतील तर मात्र ते अतिशय खराब दिसतात. केसांचा पोत एकदा खराब (5 Ways To Apply Vitamin E Capsule On Hair) व्हायला लागला की पुन्हा तो पहिल्यासारखा होण्यास बराच काळ जावा लागतो. मग त्यासाठी पार्लरमधल्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापासून ते महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्यापर्यंत असंख्य उपाय करावे (Vitamin E Capsules for Hair) लागतात. यासगळ्या उपायांमध्ये केसांसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा (5 Ways To Use Vitamin E For Shiny Hair) वापर करणे हा देखील अगदी कॉमन आणि हमखास केला जाणारा एक उपाय आहे. परंतु केसांसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा वापर नेमका कसा करावा हे बऱ्याचजणींना माहित नसते(How To Use Vitamin E Capsule For Hair Growth).
जर या व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा वापर केसांसाठी योग्य पद्धतीने केला नाही तर त्यातील संपूर्ण पोषक गुणधर्म केसांना मिळत नाहीत. परिणामी, अशा चुकीच्या पद्धतीने केसांना व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावल्याने केसांवर त्याचा हवा तसा चांगला परिणाम दिसून येत नाही. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल थेट फोडून केसांवर लावण्यापेक्षा केसांसाठी फायदेशीर अशा इतर पदार्थांमध्ये मिसळून लावल्यास त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या केसांवर दिसून येतात. यासाठीच केसांसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा वापर करताना ते कोणकोणत्या पदार्थांमध्ये मिसळून लावावे आणि त्याचे फायदे काय होतात ते पाहूयात
केसांसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा वापर करताना ते कोणत्या पदार्थांमध्ये मिसळून लावावे...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. त्यात व्हिटामिन 'ई' कॅप्सूल जेल मिसळल्याने, केसांना मुळापासून टोकापर्यंत पोषण मिळते. यासाठी एका वाटीत २ व्हिटामिन 'ई' कॅप्सूल जेल व खोबरेल तेल घालून मिक्स करून केसांना लावा. याचबरोबर, स्काल्पवर मसाज करा. आठवड्यातून एकदा या तेलाने मसाज केल्याने केस गळती थांबेल.
२. दही :- दही केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. त्यातील गुणधर्म केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत २ व्हिटामिन 'ई' कॅप्सूल जेल व दही घेऊन मिक्स करा, व ही पेस्ट केसांवर लावा. यामुळे केसांच्या अनेक लहान - मोठ्या समस्या दूर होतील.
३. एलोवेरा जेल :- केसांसाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल जेल व २ चमचे एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट केसांवर लावा. हा हेअर मास्क एक तासांसाठी केसांवर लावून ठेवा. त्यानंतर केस पाण्याने धुवा. यामुळे स्काल्प क्लिन होईल, व केसांची वाढ होईल.
चेहरा धुण्यासाठी केमिकल्सयुक्त फेसवॉशपेक्षा वापरा 'हे' ६ पदार्थ, त्वचेला मिळतील अनेक फायदे...
४. जोजोबा ऑईल :- केस वाढविण्यासाठी विटामिन 'ई' जेल आणि जोजोबा ऑईल मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता. एका वाटीत ३ ते ४ विटामिन 'ई' कॅप्सुल फोडून घ्या आणि त्यात २ चमचे जोजोबा ऑईल मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर केसांना मुळापासून लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी माईल्ड शँपूने केस धुवा. यामुळे केसांची चांगली वाढ होते. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता.
५. मध :- एका बाऊलमध्ये २ चमचे मध, २ व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल आणि थोडे दही आणि कोरफड एकत्र करून तयार पेस्ट केसांना लावा. हे मिश्रण केसांना लावल्याने कोरडेपणा दूर होतो, डोक्यातील कोंडा दूर होतो आणि स्काल्पला पुरेशी आर्द्रता मिळते.
पार्लर कशाला ? चक्क फुगे वापरुन केस करा परफेक्ट कुरुळे, पार्लर सारखा महागडा लुक्स घरच्याघरीच...
व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल केसांवर लावण्याचे फायदे...
१. केसांचा कोरडेपणा कमी करुन चमकदारपणा येण्यासाठी.
२. केसगळती थांबविण्यासाठी.
३. डोक्यातील कोंडा काढून केस अधिक चमकदार करण्यासाठी
४. केसांचे क्युटिकल्स आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी
५. स्काल्प स्वच्छ करण्यासाठी
६. केसांच्या वाढीसाठी