Join us

ना कोणतं तेल लावायचं, ना कोणता लेप! केस भराभर वाढण्यासाठी करा करिश्मा तन्नाने सांगितलेला चकटफू उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2024 12:14 IST

5 Tips For Fast Hair Growth: केस भराभर वाढून छान दाट लांबसडक व्हावेत यासाठी काय करता येईल, याविषयी माहिती सांगणारी पोस्ट अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने शेअर केली आहे.(actress Karishma Tanna shared her hair care secret)

ठळक मुद्देपाचवा उपाय आहे प्राणमुद्रा करणे. प्राणमुद्रा करण्यासाठी अनामिका आणि करंगळी दुमडून घ्या आणि अंगठ्याच्या टोकाने अनामिका आणि करंगळीच्या टोकावर जोर द्या.

केस गळण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. बऱ्याच जणींचे केस एवढे हळूहळू वाढतात की जणू काही त्यांची वाढ खुंटली आहे, असेच वाटते. एकीकडे केसांची अशी हळूहळू होणारी वाढ आणि दुसरीकडे मात्र केसांतून कंगवा किंवा हात फिरवताच गळून येणारे केस.. यामुळे काही दिवसांतच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते. तुमच्याही केसांची समस्या अशीच वाढली असेल तर अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा (5 tips for long and strong hair). हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केसांवर कोणतेही तेल किंवा लेप लावण्याची गरज नाही (actress Karishma Tanna shared her hair care secret). फक्त ५ अशा गोष्टी करायच्या आहेत, ज्यासाठी तुम्हाला केवळ काही मिनिटांचा वेळ द्यावा लागेल.(Home Remedies For Fast Hair Growth)

 

केसांची वाढ भराभर होण्यासाठी करिश्मा तन्नाने सांगितलेला उपाय

१. पहिला उपाय म्हणजे हेअर पुलिंग. हा उपाय करण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठीमध्ये थोडे थोडे केस पकडा आणि ते हलकासा जोर लावून ओढा. केस खूप जोरात ओढू नये. अन्यथा ते तुटू शकतात. यामुळे केसांच्या मुळाशी हलकासा दाब येऊन त्वचेखालचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट- त्वचा काेरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्सचा 'असा' करा वापर

२. दुसरा उपाय म्हणजे मस्तकावर तळहाताने थोडं थापटल्यासारखं करा. यामुळे त्वचेतला रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

३. तिसरा उपाय म्हणजे बॅक कोंबिंग. सामान्यपणे आपण केस पुढून मागे या पद्धतीने विंचरतो. पण बॅक कोंबिंग करण्यासाठी केस मागून पुढे अशा पद्धतीने विंचरावे. ५ मिनिटांसाठी हळुवारपणे ही क्रिया करावी.

 

४. चौथा उपाय करण्यासाठी बेडवर पाठ टेकवून झोपा आणि डोके गादीच्या खाली झुकल्यासारखे करा. यालाच हेड ड्रॉप एक्सरसाईज असे म्हणतात. हा उपायही साधारण ५ मिनिटांसाठी करावा. तुम्हाला जर मानदुखी, पाठदुखीचा खूप त्रास असेल तर हा उपाय करू नका.

लग्नसराईत घालायलाच हवी टिपिकल मराठी बुगडी! बघा ८ सुंदर पॅटर्न- चारचौघीत उठून दिसाल

५. पाचवा उपाय आहे प्राणमुद्रा करणे. प्राणमुद्रा करण्यासाठी अनामिका आणि करंगळी दुमडून घ्या आणि अंगठ्याच्या टोकाने अनामिका आणि करंगळीच्या टोकावर जोर द्या. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीकरिश्मा तन्नाहोम रेमेडी