lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..

दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..

4 Ways to Protect Your Hair While You Sleep : रात्री झोपण्यापूर्वी ‘अशी’ घ्या केसांची काळजी, केस कधी गळत होते हेच विसराल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 10:02 AM2024-04-22T10:02:26+5:302024-04-22T10:05:02+5:30

4 Ways to Protect Your Hair While You Sleep : रात्री झोपण्यापूर्वी ‘अशी’ घ्या केसांची काळजी, केस कधी गळत होते हेच विसराल..

4 Ways to Protect Your Hair While You Sleep | दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..

दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..

मुली असो किंवा महिला प्रत्येकीला चमकदार केस हवे असतात (Hair care tips). पण केसांची योग्य निगा नाही राखल्यास केसांच्या समस्या वाढत जातात. सध्याची बदलती जीवनशैलीमुळे फक्त आरोग्यचं नसून, त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या वाढतात (Beauty Tips). काहींना दिवसभरात केसांची निगा राखायला वेळ मिळत नाही. अशावेळी काही महिला ब्यूटी पार्लरकडे धाव घेतात.

पण ब्यूटी पार्लरमध्ये जास्त खर्च करण्यापेक्षा आपण रात्री झोपण्यापूर्वी केसांची 'अशी' काळजी घेतल्यास, केसांचे जीवन वाढू शकते. रात्रीचे काम आटपून झोपी जाण्याआधी, केसांची योग्य काळजी घ्यायला हवी (Night Routine). पण झोपण्यापूर्वी केसांची कशी काळजी घ्यावी? 'या' गोष्टी केल्यामुळे केसांना नक्की फायदा होतो का? पाहूयात(4 Ways to Protect Your Hair While You Sleep).

झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा

झोपण्यापूर्वी केसांना तेल लावल्याने केस निरोगी राहतात. रात्री झोपण्यापूर्वी केसांना नीट तेल लावा आणि सकाळी उठल्यावर शाम्पूने केस चांगले धुवा. रात्री केसांना तेल लावल्याने केसांना भरपूर पोषण मिळते आणि केस जाड आणि लांब होतात. आपण आठवड्यातील २ ते ३ दिवस रात्री केसांना तेल लावून झोपू शकता.

सकाळी की सायंकाळी? कोणत्या वेळेत चालल्याने वजन होते कमी आणि...

केस विंचरून झोपा

फक्त बाहेर जातानाच नाही, तर झोपण्यापूर्वीही केस विंचरणे गरजेचं आहे. यामुळे झोपेत केस तुटण्याची समस्या कमी होते. अनेकदा केसांचा गुंता तसाच राहतो. ज्यामुळे केस तुटण्याची समस्या अधिक वाढते. याशिवाय केस न विंचरता झोपल्याने केस कमकुवत होतात. अशावेळी केस नीट विंचरून झोपा.

केसांची वेणी घाला

रात्री केस विंचरून झाल्यानंतर त्याची वेणी घाला. पण केसांची वेणी घालताना वेणी घट्ट नसावी याची काळजी घ्या. कारण घट्ट वेणीमुळे केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मुळातून केस तुटतात. शिवाय कमकुवत होतात. त्यामुळे वेणी घालताना सैल घाला.

झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की..

सॅटिन उशी वापरा

ज्यांना केस गळण्याची समस्या आहे त्यांनी सॅटिन उशीचा वापर करावा. सॅटिनच्या उशीवर झोपल्याने केसगळतीपासून सुटका मिळेल. शिवाय शांत झोपही लागेल.

Web Title: 4 Ways to Protect Your Hair While You Sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.