Join us

कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? आलिया भट, नीता अंबानींचे हेअर स्टायलिस्ट सांगतात ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:49 IST

How To Take Care Of Curly Hair?: तुमचे केस जर कुरळे असतील तर त्यांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याविषयी खास टिप्स देत आहेत सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर..(4 tips to take care of curly hair by celebrity hair stylist Amit Thakur)

ठळक मुद्देआलिया भट, नीता अंबानी यांसारख्या सेलिब्रिटींचे हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी कुरळे केस असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.

आपले सौंदर्य खुलविण्यामध्ये आपल्या केसांचा वाटा खूप मोठा आहे. मग तो स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा मग पुरुषांच्या बाबतीत असो. स्त्रियांसाठी तर त्यांचे केस म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय. आपले केस छान असावेत, छान दिसावेत यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. त्यात जर एखाद्याचे केस सिल्की, चमकदार असतील तर असे केस मेंटेन करणं सोपं जातं. पण ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना केसांची काळजी घेताना खूप त्रास होतो. कुरळ्या केसांचं सौंदर्य खूपच वेगळं आहे, हे खरं असलं तरी ते केस मेंटेन ठेवणं अनेकींना कठीण जातं (4 mistakes can damage your curly hair). म्हणूनच आलिया भट, नीता अंबानी यांसारख्या सेलिब्रिटींचे हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी कुरळे केस असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.(4 tips to take care of curly hair by celebrity hair stylist Amit Thakur)

 

कुरळ्या केसांची कशी काळजी घ्यावी?

कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ अमित ठाकूर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये कुरळे केस असणाऱ्यांनी ४ गोष्टी मुळीच करू नये असं सुचवलं आहे. त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया..

अभिनेत्री भाग्यश्रीला झाला होता 'Empty Nest Syndrome'- मानसिक आजाराविषयी सांगताना ती म्हणते... 

१. पहिली गोष्ट म्हणजे कुरळे केस जर ओले असतील तर ते खूप जास्त वाऱ्यामध्ये थेट सुकवू नका. यामुळे त्यांच्या मुळांना नुकसान होऊ शकतं. शिवाय ते एकमेकांमध्ये जास्त अडकून आणखीनच फ्रिझी होऊ शकतात.

२. कुरळे केस खूप जास्त जोरजोरात विंचरू नये. यामुळे केसांचे नॅचरल कर्ल्स खराब होऊन त्यांचं टेक्स्चर बिघडतं आणि ते आणखी जास्त फ्रिजी होतात. त्यामुळे ते अतिशय हळूवारपणे विंचरा.

 

३. आपल्याला माहितीच आहे की कुरळे केस जेव्हा ओले असतात तेव्हा ते एकमेकांमध्ये खूपच जास्त गुंतलेले असतात. त्यामुळे जर ओल्या केसांमधला गुंता काढायचा असेल तर तो तुमच्या बोटांनी किंवा जाड कंगव्याने अगदी हळूवारपणे विंचरून काढा.

चरबी उतरून सुटलेलं पोट होईल एकदम सपाट, फिटनेस ट्रेनरने सांगितल्या ५ सोप्या ट्रिक्स, करून पाहा

४. कुरळ्या केसांवर कंडिशनर लावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा केस ओले असतील तेव्हा कंडिशनर अवश्य लावा. कारण केस ओले असतानाच ते सगळीकडे व्यवस्थित लागल्या जातं. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी