lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > हेअर कट केल्यावर वाटतं, आपलं माकड झालं? डोक्याला ताप नको, हेअर कट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या

हेअर कट केल्यावर वाटतं, आपलं माकड झालं? डोक्याला ताप नको, हेअर कट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या

हेअर कट करताना तो विचार करुन केला नाही, त्यात जर थोडीशीही चूक झाली तर मग मात्र मोठा भ्रमनिरास होण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. कशाला करायला गेलो हेअर कट! असा पस्तावा टाळायचा असेल तर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 12:20 PM2021-11-05T12:20:52+5:302021-11-05T12:25:02+5:30

हेअर कट करताना तो विचार करुन केला नाही, त्यात जर थोडीशीही चूक झाली तर मग मात्र मोठा भ्रमनिरास होण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. कशाला करायला गेलो हेअर कट! असा पस्तावा टाळायचा असेल तर.

4 things are important when cutting hair. | हेअर कट केल्यावर वाटतं, आपलं माकड झालं? डोक्याला ताप नको, हेअर कट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या

हेअर कट केल्यावर वाटतं, आपलं माकड झालं? डोक्याला ताप नको, हेअर कट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या

Highlightsहेअर कटबद्दल आधी हेअर स्पेशलिस्टशी बोलायला हवं.हेअर स्पेशलिस्टला आपण एखादा कट सूचवण्यापेक्षा आपल्याला कोणता कट चांगला दिसेल हे विचारायला हवं.हेअर कट केल्यानंत संपलं काम असं होत नाही. हेअर कट मेंटेन ठेवावा लागतो.

कितीतरी गोष्टी खास दिवाळीसाठी म्हणून राखून ठेवलेल्या असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हेअर कट. कित्येक महिने स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळालेला नसतो, केसांचा झालेला अवतार आपल्यालाही दिसत असतो, पण आता दिवाळी जवळ आलीये तर तेव्हाच करु केसांचं काहीतरी असं अनेकींच्या मनात सुरु असतं. अनेकींना नेहेमीपेक्षा आपला नवीन लूक हवा असतो. हेअर कट हा उत्तम मार्ग असतो लूक बदलण्याचा. तर ज्यांना बर्‍याच महिन्यांनी आज केस कापायला वेळ होणार असेल ( लक्ष्मी पूजन आटोपलं आहे आणि आज पाडवा आहे, नवरा बायकोचा स्पेशल दिवस, काही तरी नवीन सुरु करण्याचा चांगला दिवस) जे खूप दिवसांपासून आपल्या नवीन लूकच्या शोधात असतील तर नक्की हेअर कट करुन या.

हेअर कटमुळे वेगळं काही केल्याचं समाधान मिळेल. तसेच केसांना कात्री लागल्याने केस चांगले होतील. तसेच लूक बदलून आपल्या चेहेर्‍याचे फीचर्स आणखी शार्प होतील. अर्थात हेअर कटद्वारे हे सर्व फायदे होत असले तरी हेअर कट करताना तो विचार करुन केला नाही, त्यात जर थोडीशीही चूक झाली तर मग मात्र मोठा भ्रमनिरास होण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. कशाला करायला गेलो हेअर कट! असा पस्तावा झाल्याची अनेक उदाहरणं घडली आहेत, घडत आहेत. आपल्याबाबतीत हे जर टाळायचं असेल तर हेअर कट करताना काही टिप्स अवश्य लक्षात ठेवायला हव्यात.

Image: Google

हेअर कट करायचा असल्यास..

1. आपल्याला आपला लूक चांगला माहित असतो. कुठली गोष्ट आपल्याला चांगली दिसेल , दिसणार नाही याचाही चांगला अंदाज असतो. पण हेअर कटच्या बाबतीत हे अंदाज हमखास चुकतात. त्यामुळे अमूक एखादा कट आपल्या डोळ्यासमोर असला तरी आपल्याला जे हवं आहे ते केल्यावर काय होईल, आपला चेहेरा काय दिसेल याबाबत हेअर स्पेशलिस्टकडे चर्चा करायला हवी. त्यांना आपण आधी काही सुचवण्यापेक्षा मला काय चांगलं दिसेल हे त्यांनाच विचारायला हवं. त्यांनी सांगितलेल्या हेअर कटचं सॅम्पल आधी स्वत: बघायला हवं . हेअर स्टायलिस्ट जे सूचवत आहेत त्याची स्वत:ला पूर्ण खात्री पटल्यावर मग हेअर कट करावा.

2. हेअर कट नंतर हेअर कलरही अनेकींना करायचा असतो. हेअर कलर करताना आपण केलेला कट, आपल्या त्वचेचा वर्ण ( रंग) म्हणजेच स्किन टोन याचा विचार करावा लागतो. आपल्या डोळ्यासमोर केसांसाठीचे विविध कलर असले तरी भारतीय महिलांच्या केसांना शायनी रेड, बरगंडी, कॉपर रेड हे रंग छान दिसतात. पण आपला स्किन टोन कसा आहे याचा विचार करुन हेअर स्पेशलिस्टच्या मदतीने त्याला सूट होईल असा रंग निवडावा. नाहीतर हेअर कट चांगला होतो, पण हेअर कलर फसला की मात्र केसांचा आणि एकूणच चेहेर्‍याचा लूक बिघडतो.

Image: Google

3. प्रत्येक हेअर कट प्रत्येकीलाच सूट होत नाही. हेअर कट सूट होणं हे चेहरा ,बांधा यावर अवलंबून असतं तसंच आपले केस पातळ आहेत की दाट हे बघूनही हेअर कट ठरवावा लागतो. जर केस पातळ असतील तर चुकूनही लेजर कट करु नये. यामुळे केस आणखीनच पातळ आणि छोटे दिसतात. पातळ केस असतील तर लेअर कट करावा. या हेअर कटमुळे केसांची घनता ( व्हॉल्यूम) जास्त दिसते. केस पातळ असूनही पातळ दिसत नाहीत.

4. हेअर कट केल्यानंत संपलं काम , आता लूकबाबत निश्चिंत असं होत नाही. हेअर कट केल्यानंतर तो जपवाही लागतो. केसांची नीट निगा ठेवावी लागते. हेअर कट मेंटेन ठेवावा लागतो. कधी कुठले पटकन वाढलेले दिसत नाही तर काही हेअर कटमधे केस थोडे जरी वाढले की तो विचित्र दिसायला लागतो. हेअर कट मुळे बदलेला लूक सेट करुन आकर्षक करायचा असेल तर हेअर स्पेशलिस्टशी चर्चा करुन किती दिवसांनी हेअर कट करावा लागेल आधीच विचारुन ठेवावं. आणि हेअर कट त्याप्रमाणे कायम मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: 4 things are important when cutting hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.