Join us  

त्वचा कोरडी पडली-रोज काळजी घ्यायलाही वेळ नाही? करा फक्त ४ गोष्टी- त्वचा दिसेल सुंदर-तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 4:32 PM

Simple Skin Care Routine For Busy Women: त्वचेची काळजी घ्यायला तुमच्याकडे खूप वेळ नसला तर या काही साध्या- सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि तेवढंच करा.. (minimal skin care routine)

ठळक मुद्दे त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्योपचार करायला वेळ नसेल तर या काही मोजक्या गोष्टी दररोज नियमितपणे करा.

थोड्याफार महिलांचा अपवाद सोडला तर बहुतांश जणी अशा असतात, ज्यांना स्वत:कडे, स्वत:च्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नसतो. घर- ऑफिस, घरातल्या सगळ्यांच्या वेळा सांभाळताना त्यांच्या नाकीनऊ येतात. असं असताना मग स्वत:चं स्किन केअर रुटीन कसं आणि केव्हा मेंटेन करणार, असा प्रश्न त्यांना पडताे. तुमचंही असंच असेल आणि त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्योपचार करायला वेळ नसेल तर या काही मोजक्या गोष्टी दररोज नियमितपणे करा (minimal skin care routine). यामुळे त्वचा नेहमीच चमकदार, तरुण आणि सुंदर राहील. (4 Simple and easy tips for glowing and young skin in your busy schedule)

कमी वेळेत त्वचेची काळजी कशी घ्यायची?

 

१. सनस्क्रिन लोशन

सनस्क्रिन लोशन ही आता तुमच्या स्किनकेअर रुटीनमधली अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे. तुम्ही उन्हामध्ये जाणार नसाल, बाहेर थंडी असेल किंवा पावसाळा असेल तरी दररोज दिवसा सनस्क्रिन लावणं खूप गरजेचं आहे. यामुळे त्वचेवर पिगमेंटेशन, सनबर्न असा त्रास होणार नाही. 

सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा...

२. मॉईश्चरायझर

बाजारात मिळणाऱ्या अनेक फॅन्सी मॉईश्चरायझरला न भुलता तुम्ही त्वचेसाठी नेहमी उत्तम दर्जाचं मॉईश्चरायझर निवडलं पाहिजे. ज्यामध्ये केमिकल्स कमी आणि नॅचरल पदार्थ जास्त असतील. तसेच जे मॉईश्चरायझर तुमच्या त्वचेला जास्त ऑईली किंवा ड्राय बनवेल, ते मॉईश्चरायझर लावणं टाळावं.

 

३. चेहरा धुणे

दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा धुतला पाहिजे. पण चेहरा धुताना फेसवॉश एकदाच वापरा. प्रत्येकवेळी फेसवॉश वापरण्याची गरज नाही.

अंबानी प्री-वेडिंग : प्रिसिला चान-करिना कपूर ते कियारा अडवानी-पाहा देखण्या सुंदर साड्यांची एक झलक

४. सेरम

व्हिटॅमिन सी असणारं सेरम त्वचेला दिवसातून एकदा जरुर लावा. याशिवाय दररोज भरपूर पाणी पिणे, रात्रीची झोप पुर्ण घेणे आणि संतुलित आहार ठेवणेही गरजेचे आहे.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी