बऱ्याच जणांच्या बाबतीत सध्या असं दिसून येत आहे की कमी वयातच केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. अगदी कॉलेजमधल्या कित्येक मुलामुलींचे केसही पांढरे झालेले असतात. केस पांढरे झाले की आपोआपच कॉन्फिडन्सही कमी होतो. पांढऱ्या केसांमुळे आपण इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहोत किंवा वयापेक्षा जास्तच प्रौढ दिसत आहोत, ही भावना बळावते. म्हणूनच पांढऱ्या केसांवर त्वरीत उपाय करणं गरजेचं आहे (3 Tips For black and Shiny Hair). पुढे सांगितलेले काही उपाय केस पांढरे होण्याचं प्रमाण निश्चितच कमी करू शकतात (home hacks to reduce hair fall). त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ते पाहूया...(how to get rid of gray hair?)
कमी वयातच केस पांढरे होऊ नयेत म्हणून काय उपाय करावा?
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आहारात कडिपत्ता आणि आवळा या दोन्ही पदार्थांचं प्रमाण वाढवा. कारण केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे दोन्ही पदार्थ अतिशय गुणकारी आहेत.
जेवताना चुका करता म्हणून वजन वाढतं, तब्येत बिघडते! ३ 'S' लक्षात ठेवा- कित्येक आजार टळतील
२. केसांसाठी घरच्याघरीच तेल तयार करा. यासाठी १ वाटी खोबरेल तेल एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवा. त्यामध्ये ३ ते ४ जास्वंदाची फुलं, ४ ते ५ जास्वंदाची पानं आणि अर्धी वाटी कडिपत्त्याची पानं बारीक करून टाका. तेलाला चांगली उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा. यानंतर हे तेल गाळून घ्या. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांना मालिश करा आणि त्यानंतर २ ते ३ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. यामुळे केस पांढरे होणंही थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल.
३. केसांना नियमितपणे प्रोटीनयुक्त हेअरमास्क लावल्यानेही केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. हा उपाय करण्यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला.
शांत, गाढ झोप लागतच नाही- सारखी जाग येते? ५ गोष्टी करा, मस्त झोप होऊन फ्रेश व्हाल
दुसऱ्यादिवशी भिजलेले मेथी दाणे दही घालून मिक्सरमधून वाटून घ्या. आता हा लेप केसांच्या मुळाशी लावा. यानंतर तांदळाच्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केस गळण्याचं आणि कमी वयात पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल.