Join us  

या ३ चुकांमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात केस गळणं कमी करायचं तर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 11:50 AM

3 Common Mistakes That Lead To Hair Fall: केस गळणं खूप जास्त वाढलं असेल तर तुम्हीही या काही चुका करत नाही ना, ते एकदा तपासून पाहा.

ठळक मुद्देकेस गळणं वाढविण्यासाठी आपल्या कोणत्या चुका कारणीभूत ठरत आहेत ते एकदा बघा.

हल्ली केस गळण्याचं प्रमाण खूपच जास्त वाढलं आहे. काही जणांचे केस खूप गळतात तर काही जणांचे केस अकाली पांढरे होत आहेत. केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. केसांशी संबंधित या तक्रारींसाठी आपली बदललेली जीवनशैली सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. आपल्या रुटीनमध्ये आपण असे काही बदल केले आहेत, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी हानिकारक ठरतात (How to control hair fall). केस गळणं वाढविण्यासाठी आपल्या कोणत्या चुका कारणीभूत ठरत आहेत ते एकदा बघा (Ayurvedic remedies to control hair fall). या चुका टाळल्या तर नक्कीच केस गळणं कमी होऊ शकतं. (3 common mistakes that lead to hair fall)

केस गळण्याची कारणे

कोणत्या ३ चुकांमुळे केस गळण्याची समस्या वाढत आहे, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी vaidya_mihir_khatri  इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पार्टनरसोबत बेड शेअर करावा की एकटंच झोपावं- मानसिक आरोग्यासाठी काय जास्त चांगलं? अभ्यास सांगतो....

१. मध आणि काेमटपाणी

वेटलॉस होईल म्हणून किंवा आरोग्यासाठी फायदेशीर असतं म्हणून अनेक जण सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात मध टाकून पितात. आयुर्वेदानुसार हा एक विरुद्ध आहार मानला गेला आहे. असे करणारे जे जे लोक आहेत, त्यांचे केस गळणं खूप वाढलेलं आहे, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

 

२. डाएटिंग

वजन कमी करण्याच्या नादात हल्ली अनेक जण मनानेच आहार कमी करतात.

चहाप्रेमी असाल तर 'हे' बघाच, चक्क फळं टाकून केला चहा- पाहा फळांच्या चहाची व्हायरल रेसिपी 

असं करताना शरीराला योग्य ती पोषणमुल्ये मिळतात की नाही, याचा विचार करत नाही. त्यामुळे मग योग्य ते पोषण शरीराला आणि केसांना न मिळाल्याने डाएटिंग करणाऱ्या अनेकांमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढलं आहे.

 

३. गरम पाणी 

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरत असाल तर त्यामुळेही केसांच्या मुळांवर परिणाम होतो.

झाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? रोपांना घाला 'पांढरं' पाणी- पुन्हा होतील हिरवीगार

केसांची मुळं नाजूक होतात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे केस धुण्यासाठी नेहमीच थंड किंवा कोमट पाणी वापरावं.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपायइन्स्टाग्राम