Lokmat Sakhi >Beauty > Hair Care: पांढरे केस नॅचरली होऊ लागतील काळे! करून पाहा ३ सोपे आयुर्वेदिक उपाय 

Hair Care: पांढरे केस नॅचरली होऊ लागतील काळे! करून पाहा ३ सोपे आयुर्वेदिक उपाय 

Best Home Remedies For Gray Hair: कमी वयातच केस पांढरे होण्यामागची काय कारणं आहेत आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो ते पाहुया..(how to get rid of gray hair?) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 15:37 IST2025-02-05T15:36:02+5:302025-02-05T15:37:06+5:30

Best Home Remedies For Gray Hair: कमी वयातच केस पांढरे होण्यामागची काय कारणं आहेत आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो ते पाहुया..(how to get rid of gray hair?) 

3 best natural remedies to turn your gray hair black, how to get rid of gray hair? best home remedies for white hair | Hair Care: पांढरे केस नॅचरली होऊ लागतील काळे! करून पाहा ३ सोपे आयुर्वेदिक उपाय 

Hair Care: पांढरे केस नॅचरली होऊ लागतील काळे! करून पाहा ३ सोपे आयुर्वेदिक उपाय 

Highlightsहे काही उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस नैसर्गिकपणे काळे होण्यास मदत होईल. तसेच केस पांढरे होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. शाळकरी मुलांचेही केस पांढरे झालेले दिसून येतात. यासाठी बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकताही जबाबदार आहे. पण त्यासोबतच योग्य आहार आणि केसांची योग्य काळजी घेतली तर केस पांढरे होण्याचे प्रमाण नक्कीच कमी करता येते (how to get rid of gray hair?). त्यासाठी नेमकं काय करावं याविषयीचे काही उपाय बघा.(3 best natural remedies to turn your gray hair black)

 

कमी वयातच केस पांढरे होण्यामागची कारणं आणि उपाय 

कमी वयातच केस पांढरे का होत आहेत आणि त्यावर काय घरगुती उपाय करता येतील याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी healyourselfwith_manasikrishna या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

स्क्रिन पाहून डोळे होत आहेत खराब, मुलांना लागतोय चष्मा! 'हे' पदार्थ खा- नजर राहील तेज

यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की जे लोक पित्तमय पदार्थ जास्त प्रमाणात खातात त्यांचे केस तुलनेने लवकर पांढरे होतात. 

आहारात मीठ, लोणचं असे पदार्थही जास्त प्रमाणात खाणे टाळावे. कारण यामुळेही केस पांढरे होण्याचा धोका वाढतो. 

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून काय उपाय?

१. चमचाभर काळे तीळ आणि खोबऱ्याचा तुकडा दररोज रात्री झोपताना गरम पाण्यासोबत बारीक चावून खावा.

२. दुसरा उपाय म्हणजे दररोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस आणि कोथिंबीरचा ज्यूस एकत्र करून प्यावा. यामुळे शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर जातात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते. 

मुलांनी पालकांचं ऐकणं चांगलंच; पण आई- बाबांनो 'या' बाबतीत मुलांना मुळीच आग्रह करू नका

३. तिसरा उपाय म्हणजे खोबरेल तेलामध्ये कडीपत्त्याची काही पाने टाका आणि तेल गॅसवर उकळायला ठेवा. जेव्हा कडीपत्त्याची पाने थोडी कुरकुरीत होतील तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर कडीपत्त्याच्या पानांचा चुरा केसांना लावा आणि त्यानंतर तेल लावून डोक्याला मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाका. हे काही उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस नैसर्गिकपणे काळे होण्यास मदत होईल तसेच केस पांढरे होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.


 

Web Title: 3 best natural remedies to turn your gray hair black, how to get rid of gray hair? best home remedies for white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.