बऱ्याचदा असं होतं की आपलं केसांकडे व्यवस्थित लक्ष देणं होत नाही. त्याचा परिणाम मग हळूहळू केसांवर दिसू लागतो आणि केस खूपच कोरडे, रुक्ष व्हायला लागतात. केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. रुक्ष, कोरडे केस अजिबातच चांगले दिसत नाही. म्हणूनच अशा केसांना पुन्हा मऊसूत, सिल्की आणि चमकदार करायचं असेल तर काही घरगुती उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतात (2 simple remedies for silky and shiny hair). जे उपाय करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागतात ते उपाय आपण अगदी थोडक्या पैशांत घरीच करू शकतो (how to get rid of dry hair?). ते उपाय नेमके कोणते ते पाहूया..(home made hair mask for rough hair)
केस चमकदार, सिल्की होण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ ते २ चमचे जवस घाला. यानंतर पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाणी सतत अधून मधून हलवत राहा. जेव्हा पाण्याला उकळी येऊन ते थोडं जेलसारखं घट्ट व्हायला लागेल तेव्हा गॅस बंद करा.
तोंडाला चव आणणारी झणझणीत दही बेसन मिरची! मिळमिळीत जेवणही होईल एकदम चविष्ट...
आता हे पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर केसांना लावा. साधारण एखाद्या तासाने शाम्पू करून केस धुवून टाका. महिन्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
२. केसांवर चमक आणण्यासाठी आणि राठ झालेल्या केसांना पुन्हा एकदा मऊ, चमकदार करण्यासाठी पुढे सांगितलेला एक उपायही खूप उपयुक्त ठरणारा आहे. हा उपाय करण्यासाठी एक पिकलेले केळ घ्या.
लग्नापर्यंत चेहऱ्यावर मस्त ग्लो हवा? ५ साध्या- सोप्या टिप्स, फेशियल न करताही चेहरा चमकेल..
ते कुस्करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यामध्येच २ चमचा कोरफडीचा ताजा गर आणि २ चमचे भात घाला. आता हे पदार्थ मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यानंतर हे मिश्रण केसांना लावा. एखाद्या तासाने केस धुवून टाका. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. केस खूप मऊ आणि चमकदार होतील.
