हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. कोणाचे केस खूप जास्त गळतात तर कोणाच्या केसांना अजिबातच वाढ नसते. कोणाच्या डोक्यामध्ये खूप जास्त कोंडा असतो तर कोणाचे केस कमी वयातच पांढरे होतात. केसांची अशी कोणतीही समस्या असेल तर ती कमी करण्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी काही घरगुती उपाय सुचवले आहेत (2 hair care tips for long and thick hair). ते काही साधे सोपे उपाय नियमितपणे केल्यास केसांच्या सगळ्याच समस्या कमी होऊ शकतात (how to control hair loss?). ते उपाय नेमके कोणते ते पाहूया..(how to make hair oil at home?)
केस जाड आणि लांब होण्यासाठी काय उपाय करावे?
केसांचं गळणं कमी होऊन त्यांची पटापट वाढ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ glowgalore या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक
१. यामध्ये सांगण्यात आलेला पहिला उपाय म्हणजे केसांना नियमितपणे तेल लावून मालिश करा. यासाठी एक वाटी खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याची १५ ते २० पाने आणि ४ ते ५ जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या घाला. तेल गरम करायला ठेवा आणि ७ ते ८ मिनिटे चांगलं उकळू द्या. तेल कोमट झाल्यानंतर गाळून बरणीत भरून ठेवा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मसाज करा आणि नंतर दोन तासांनी शाम्पू करून केस धुवून टाका.
२. दुसरा उपाय म्हणजे केसांना आठवड्यातून एकदा प्रोटीन मास्क लावणे. यासाठी मुग डाळ, मेथी दाणे सम प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजत घाला.
टॅनिंग वाढल्याने चेहरा काळवंडला? त्वचेचा काळेपणा घालविण्यासाठी जावेद हबीब सांगतात खास उपाय
दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्यात दही घालून हा मास्क केसांच्या मुळाशी आणि लांबीवर लावा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. केसांना छान पोषण तर मिळेलच पण केस छान सिल्की, मुलायम होऊन त्यांचं गळणं कमी होईल.