हल्ली केस सेट करण्याचा ट्रेण्ड खूप वाढत चालला आहे. पार्टीला जायचं असो, कुठे आऊटिंगसाठी बाहेर जायचं असो किंवा घरात एखादा समारंभ असो.. कित्येक जणी अगदी न चुकता केस स्ट्रेट करतात किंवा त्यांचं छान सेटिंग करून घेतात. दरवेळी केसांच्या सेटिंगसाठी खरंतर पैसे खर्च करण्याची इच्छा होत नाही. पण तरीही केस चांगले दिसावे म्हणून या गोष्टी करणं अनेकींना खूप गरजेचं वाटतं. काही जणी पार्लरमध्ये न जाता घरीच हेअर स्ट्रेटनर वापरून केस स्ट्रेट करतात. पण तुमच्याकडे ते नसेल तर हा एक सोपा उपाय पाहा आणि अगदी शुन्य रुपयांमध्ये केस स्ट्रेट करा. (how to do hair straightening without using hair straightener or any other heating tool?)
घरच्याघरी केस स्ट्रेट कसे करावे?
ज्यांच्याकडे हेअर स्ट्रेटनर नसतं त्या इस्त्रीचा वापर करून केस स्ट्रेट करतात. कॉलेजच्या मुलींमध्ये आणि विशेषत: हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये तर हा ट्रेण्ड आजही खूप चालतो.
मुलांना शाळेत लवकर घालण्याची घाई टाळा! त्यांच्या भविष्यावर होतील धोकादायक परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
बघणाऱ्याला हा प्रकार थोडा डेंजर वाटत असला तरी त्या मुलींना इस्त्रीने केस स्ट्रेट करण्याची एवढी सवय झालेली असते की अगदी सर्रास त्या एकमेकींना हेअर स्ट्रेटनिंग करून देतात. पण इस्त्रीच्या उष्णतेमुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. बऱ्याचदा तर केस खूप कोरडेही होतात. म्हणूनच यापेक्षाही एक अतिशय सोपा आणि केसांचं कोणतंही नुकसान न करणारा एक सोपा पर्याय आपण पाहूया. हा उपाय vibhasharma23 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला क्रंचेस प्रकारातल्या रबरबँडची गरज लागणार आहे. केसांचा मधोमध भांगा पाडा आणि दोन भागात केस विभागून घ्या. यानंतर दोन झिट्टू घालावे तसे सगळ्यात आधी केस बांधून घ्या.
कॉटन साडी नेसताना लक्षात ठेवा ५ टिप्स, नेहमीच दिसाल कमाल, सगळेच म्हणतील 'व्वॉव... '
यानंतर केसांना अगदी शेवटपर्यंत एकानंतर एक या पद्धतीने क्रंचेस लावून घ्या. यापद्धतीने ३ ते ४ तास केस बांधलेले राहू द्या. यानंतर तुम्ही जेव्हा क्रंचेस काढाल तेव्हा तुम्हाला केस खूप छान पद्धतीने स्ट्रेट होऊन सेट झाल्यासारखे जाणवतील. एकदा ट्राय करून पाहा.