Join us

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:48 IST

1 / 10
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला.
2 / 10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले.
3 / 10
शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
4 / 10
आमदार वैभव नाईक, खासदार अरविंद सावंत यांच्यासमेवत उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच, ही मशाल अन्यायाला जाळणारी असल्याचंही ते म्हणाले.
5 / 10
शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने घोषणाबाजी केली. तसेच, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचंही सांगितले. यावेळी, उद्धव ठाकरेंनी हात जोडून सर्वांचे धन्यवाद केले.
6 / 10
शिवसैनिकांच्या आग्रहास्तव मशाल हाती घेऊन काही सूचनाही केल्या. यावेळी पेटती मशाल घेऊन शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले होते. नवीन चिन्हाचा असाही जल्लोष शिवसेनेनं साजरा केला.
7 / 10
दरम्यान, अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र शेअर केले आहे. सावंत यांनी ट्विट केलेले हे व्यंगचित्र 1984 ते 1985 च्या काळात काढल्याचे नमूद केले आहे.
8 / 10
'हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 1984/85 मध्ये काढलेले बोलके व्यंगचित्र… #मशाल' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
9 / 10
व्यंगचित्रामध्ये भाजपावर निशाणा साधत कमळ शिवसेने हाती घेतले त्यावेळी सुखावला होता, आता मात्र शिवसेने हातात मशाल घेतली असून तिची धग सहन करा असा इशारा दिला आहे.
10 / 10
एकंदरीत यापूर्वीही शिवसेनेनं मशाल चिन्हावर निवडणूक लढवल्या असून विजयही मिळवला होता, त्यामुळे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आठवण अनेक शिवसैनिकांनी शेअर केली आहे.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे