शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:10 PM2022-01-22T14:10:27+5:302022-01-22T14:24:16+5:30

जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे हे सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. नुथराम गोडसेची भूमिका साकारलेला त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

कोल्हेंच्या या चित्रपटाचा वाद सध्या सोशल मीडियावर रंगला आहे. याबाबत, कोल्हेंनी अनेकदा स्पष्टीकरणही दिलं आहे. आता, त्यांनी शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याची चांगली माहिती शेअर केली आहे.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत.

देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे.

जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे.

मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.

देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल. सर्व जवानांना माझा सलाम! जय शिवराय! असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.