1 / 10स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची आज 138 वी जयंती साजरी होत आहे. कोरोनाच्या सावटात सामाजिक, विधायक उपक्रमांनी देशभरात जंयती साध्याच पद्धतीने साजरी होत आहे. 2 / 10देशात अनेक ठिकाणी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर, काही ठिकाणी पुतळ्याला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली.3 / 10सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे 28 मे 1883 रोजी झाला. विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. 4 / 10सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी आणि हिंदुसंघटक होते.5 / 10 सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द प्रदान केले आहेत. त्यातील 'दिनांक' हा एक शब्द आहे. 6 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक दिग्गजांनी सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 7 / 10स्वातंत्र्याच्या लढाईतील महान क्रांतीकारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 8 / 10मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे प्रमुख राज ठाकरेंसह दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 9 / 10स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय. 10 / 10विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य, शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन, असं त्यांनी म्हटलंय.