Sanjay Raut: शिवसैनिकांची गर्दी, राऊतांची आक्रमता अन् सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:48 PM2022-02-15T19:48:22+5:302022-02-15T20:11:07+5:30

राऊत यांच्या पत्रकार परिषदेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होती. त्यामुळेच, ट्विटर आणि फेसबुकवर राऊतांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं, नंतर माझ्याकडे वळले.

पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं.

यावेळी, भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात कारपेट तब्बल साडे नऊ कोटींचं वापरल्याचां गंभीर आरोपही त्यांनी केला. तर, किरीट सोमय्यांना दलाल संबोधत त्यांच्यावर आरोपांना प्रत्युत्तरही दिलं.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, कडक पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

राऊत आज नेमकं काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसैनिकांपासून ते भाजपच्या समर्थकांपर्यंत सर्वांनीच याकडे विशेष लक्ष दिले.

राऊत यांनी जय महाराष्ट्र म्हणत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यावेळी, अमित शहा हेही ही पत्रकार परिषद पाहात असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे मला सकाळपासूनच फोन येत आहेत. मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्याशीही माझे फोनवर बोलणे झाल्याचे राऊत यांनी म्हटले

राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, मी कुणालाही भीत नाही, असं तुरुंगच बनलं नाही, जे मला 2 वर्षे आतमध्ये टाकेल.

राऊत यांच्या पत्रकार परिषदेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होती. त्यामुळेच, ट्विटर आणि फेसबुकवर राऊतांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

मुंबईतील शिवसेना भनवाबाहेर जमलेली गर्दी आणि शिवसैनिकांनी केलेली तयारी याचेही फोटो समोर आले आहेत.