Rupali Chakankar : तुम्ही पेपर वाचला का? पवारांचा चाकणकरांना आजचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:35 PM2021-10-22T18:35:27+5:302021-10-22T18:54:04+5:30

आयोगाच्या कामाची संपूर्ण माहिती सांगत, आयोगाशी, महिला पोलिसांशी संबधित राज्यभरातील घटनांबद्दल अनुभव सांगितले. यावेळी तुम्ही आजचा पेपर वाचला का? असे विचारत पवार यांनी स्वतः त्यांना पेपर वाचायला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद स्विकारल्यानं राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.

जयंत पाटील हे एका कुटुंबप्रमुखाचं उत्तम उदाहरण, राज्यभरात संघटनेची बांधणी करत असताना अतिशय शांत आणि संयमीपणे आपण कार्यकर्त्यांना समजून घेत मार्गदर्शन करत असतात.

संघटनेची कार्यकर्ता म्हणून आपण जी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची जबाबदारी मला दिली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार, असे चाकणकर यांनी जयंत पाटील यांच्या भेटीत म्हटले.

चाकणकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. प्रसन्न सकाळमधील शरद पवार यांची प्रसन्न मुद्रा, देवघरातील विठुरायाच्या दर्शनाची अनुभुती देऊन गेल्याचं त्यांनी म्हटलं.

आयोगाच्या कामाची संपूर्ण माहिती सांगत, आयोगाशी, महिला पोलिसांशी संबधित राज्यभरातील घटनांबद्दल अनुभव सांगितले. यावेळी तुम्ही आजचा पेपर वाचला का? असे विचारत पवार यांनी स्वतः त्यांना पेपर वाचायला दिला.

त्या पेपरवरील लेख पाहून मला सुखद धक्काच बसला."आक्रमक चेहरा" या शीर्षकाखाली माझ्याविषयीचा तो लेख होता, असा प्रसंग चाकणकर यांनी सांगितला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून करावयाच्या कामांबद्दल सल्ला व मार्गदर्शन मिळाले. शरद पवार यांच्या समृद्ध विचारांच्या व अनुभवाच्या विद्यापीठातील विद्यार्थीनी असल्याचा कायमच गर्व वाटतो, असेही चाकणकर यांनी म्हटलं.

चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी पक्ष विचार, मतभेद बाजूला ठेवून सर्वसमावेशक काम करून सर्व महिलांच्या प्रश्न व समस्यांना न्याय मिळेल, असे काम करण्याचा सल्ला दिला.