मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:26 IST2025-08-29T19:17:24+5:302025-08-29T19:26:53+5:30

Rui Katsu Therapy and Cry Club Mumbai: पैसे द्यायचे आणि तुम्हाला मनमोकळ करून तासभर रडता येणार... हे मुंबईत होतंय... इथे जाता यावं म्हणून अनेक लोक रांगेत उभे राहतात आणि नोंदणीही करतात.

पैसे द्या आणि तासभर रडा, असं तुम्हाला कुणी म्हणालं, तर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण, हे मुंबईत घडतंय. याठिकाणी नोंदणी करण्यासाठी लोक प्रवेशद्वाराबाहेर रांगा लावतात. कारण त्यांना मनातील खदखद कुणाला तरी सांगायची आहे आणि मनमोकळ करत रडायचं आहे.

हे ठिकाण आहे क्राय क्लब... काही आठवड्यांपूर्वी मुंबईत क्राय क्लबची अनेक भागात केंद्र सुरू झाली. इथे लोकांना सुरक्षित वातावरण दिलं जातं, जेणेकरून ते त्यांच्या राग, संताप, दुःख, तणाव मोकळेपणाने बोलू शकतील आणि हा अतिताण रडण्यातून हलका करू शकतील.

यासाठी क्राय क्लब पैसे घेतो. इथे अनोळखी लोक येतात. त्यांना चांगली आणि सुरक्षित वातावरण दिलं जातं. त्यांना इथे कुणीही कसलेही प्रश्न विचारत नाही किंवा नाव ठेवत नाही. त्यांना त्यांच्या व्यथा, वेदना कुठलीही अडणीशिवाय सांगता येतात.

रडणे हा कमकुवतपणा नाहीये, हे इथे सांगितले जाते. रडण्यामुळे मनमोकळ होतं आणि तणाव कमी होतो. मानसिक आरोग्य संतुलित राहावं म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे, असे वातावरण या क्लबमध्ये उपलब्ध करून दिलं जातं.

सगळे लोक अनोळखी असतात. ते ग्रुप करून बसतात. तिथे त्यांच्य अडचणी सांगतात आणि रडतात. ही संकल्पना जपानी आहे. तिला रुईकात्सू असं म्हणतात. या संकल्पनेचा उद्देश जाणीवपूर्वक रडून भावनिक आणि मानसिक तणाव कमी करणे हा असतो.

रुईकात्सू हा शब्द दोन जपानी शब्दांनी मिळून बनला आहे. रुई म्हणजे अश्रू आणि कात्सू म्हणजे क्रिया किंवा शोध. अश्रूंसाठीची क्रिया वा अश्रूंचा शोध असाही त्याचा अर्थ होतो. एक कार्यशाळा किंवा ग्रुपचा मेळावा घेतला जातो, जिथे लोकांना एकत्र आणून भावनिक चित्रपट, कथा किंवा संगीत ऐकवून रडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.