मी साहेबांसोबत... शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 15:46 IST2019-09-27T15:36:38+5:302019-09-27T15:46:45+5:30

राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली होती.
बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी 144 कलमान्वये जमावबंदी लागू केली होती.
शरद पवारांवरील ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मी साहेबांसोबत असं म्हणत शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी बंद आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
संविधानिक संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून सत्ताधाऱ्यांकडून वापर होत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बारीकसारिक हालचालीवर लक्ष ठेवले.
सुमारे 1 हजार 500 पोलीस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
ईडी कार्यालयाकडून शरद पवारांना ईमेल पाठविण्यात आला आहे. तुर्तास चौकशीची कोणतीही गरज नाही असं ईडीने स्पष्ट केलं आहे.