राज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 19:17 IST2018-05-27T19:17:13+5:302018-05-27T19:17:13+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन भावांनी मतभेद बाजुला ठेऊन मराठी माणसांसाठी एकत्र यावे यासाठी एक कार्यकर्ता रविवारी चक्क दादरच्या उड्डाणपुलावर चढला होता. (छाया- सुशील कदम)
या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता. (छाया- सुशील कदम)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी त्याने केली. सुमारे तासभर श्याम उड्डाणपुलावर ठाण मांडून होता. (छाया- सुशील कदम)
हा सगळा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
अखेर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले (छाया- सुशील कदम)