Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय; कसं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं 'राजगृह'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 15:34 IST

1 / 10
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. यात सीसीटीव्ही आणि घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी संध्याकाळी २ अज्ञातांनी हा दुर्दैवी प्रकार केला.
2 / 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहचं आणि त्यांच्या अनुयायाचं एक भावनिक नातं आहे, बाबासाहेबांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
3 / 10
तर राजृगह निवासस्थानाची तोडफोड केल्यानं लोकभावनांचा उद्रेक होईल यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केले आहे.
4 / 10
राजगृह हे मुंबईमधील दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी परिसरात असणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही ऐतिहासिक पवित्र वास्तू तीन मजल्यांची आहे. बौद्ध चळवळीतील जनतेचे प्रमुख श्रद्धास्थान असून याठिकाणी लाखो अनुयायी आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी भेट देतात.
5 / 10
राजगृह या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक बनवण्याची योजना होती, परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींमुळे हे शक्य झालं नाही, बाबासाहेबांनी याठिकाणी ५० हजाराहून अधिक ग्रंथ आणि पुस्तकांचा संग्रह केला आहे. हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रथांलय आहे.
6 / 10
२०१३ मध्ये राजगृह या वास्तूचा हेरिटेजमध्ये समावेश झाला. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यालय परळ विभागात होते, येथे राहत्या घरी त्यांच्या पुस्तकांना जागा अपुरी पडू लागली म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधायचे मनावर घेतले.
7 / 10
दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरु केले.
8 / 10
१९३१-३३ या दोन वर्षात बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट पैकी एक चार मिनार नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी १९४१ मध्ये विकला.
9 / 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजगृह या ग्रंथालय असणाऱ्या इमारतीत कुटुंबीयांसह राहत होते. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.
10 / 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजगृह निवासस्थानी कुटुंबासह काढलेला फोटो, यात मुलगा यशवंत, पत्नी रमाबाई, वहिनी लक्ष्मीबाई, पुतण्या मुकुंदराव आणि त्यांचा प्रेमळ श्वास टॉबी, हा फोटो आंबेडकरांनी फेब्रवारी १९३४ मध्ये काढलेला आहे(स्त्रोत – दिक्षाभूमी, नागपूर प्रकाशित लोकवांग्मय प्रकाशन)
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर