भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:45 IST2025-07-21T10:34:40+5:302025-07-21T10:45:38+5:30
July 11, 2006 Mumbai local bomb blast News : आरोपींनी दाखल केलेल्या आव्हानावर आज कोर्टाने या १२ ही जणांना निर्दोष सोडले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण सुटणार आहेत.

११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट घड़विण्यात आली होती.
या बॉम्बस्फोटाची तीव्रता तुम्हाला फोटोतून कळेल, एवढी भयाण, भीषण होती. या पीडितांना न्याय मिळाला असे वाटत असतानाच आता आरोपींनी केलेल्या आव्हानावरील निकाल आला आहे.
पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. याच्या जखमा पीडित कुटुंब, जखमींवर आजही कायम आहेत.
प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवून ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये ठेवण्यात आले होते.
या साखळी स्फोटांमध्ये २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला होता. तर ७१४ जण जखमी झाले होते.
'लष्कर-ए-कहर' या दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.
चर्चगेट स्टेशनमध्ये दहशतवाद्यांनी लोकलमध्ये बॉम्ब ठेवले होते.
इंडियन मुजाहिदीनच्या हस्तकाने २००९ मध्ये कटातील सहभागाची कबुली दिली होती. सुमारे नऊ वर्षे या प्रकरणाचा खटला सुरु होता.
कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरविले होते. यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर सात जणांना जन्मठेप झाली होती.
आरोपींनी दाखल केलेल्या आव्हानावर आज कोर्टाने या १२ ही जणांना निर्दोष सोडले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण सुटणार आहेत.