मुंबईत जोर‘धार’ पाऊस, हिंदमाता परिसरात साचलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:23 IST2017-08-29T11:41:59+5:302017-08-29T20:23:03+5:30

मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपलं आहे. गेल्या 24 तासात 152 मिमी पावसाची नोंद झाली असून घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागाला पावसाने चांगलंच झोडपलं आहे.

मुसळधार पावसामुळे परेलमधील हिंदमाता भागात पाणी साचलं असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. (फोटो - सुशील कदम)

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसाने विमानांची उड्डाणंही 30 ते 40 मिनिटं उशिरानं होतं आहेत. (फोटो - सुशील कदम)

येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.