HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:26 PM2021-06-14T22:26:24+5:302021-06-14T22:44:55+5:30

राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ५३ फूट भव्यदिव्य भिंतीवरील चित्राचं आज अनावरण करण्यात आलं आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या भिंतीचित्राचं अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाला मनसे नेते अनिल शिदोरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर मनसे अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून राज ठाकरेंचे हे भव्य भिंती चित्र साकारण्यात आलं आहे.

७ दिवसांत चित्रकार निखील खैरनार यांनी राज ठाकरेंचे भव्यदिव्य चित्र साकारलं आहे. या कार्यक्रमात वसंत मोरे म्हणाले की, माझ्या नेत्यावर असलेले प्रेम मी व्यक्त करू शकत नाही. माझा नेता देशात, राज्यात सर्वोच्च पातळीवर असावा हीच माझी इच्छा आहे.

पुण्यातून त्याची सुरुवात करणार आहे. राज ठाकरेंचा पुढील वाढदिवस हा पुणे महापालिकेत साजरा करायचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात.

खासदार संजय राऊत यांच्यासमेवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसलेला हा फोटो, कुठल्यातरी मुद्द्यावरुन तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं दिसून येत आहे

राज ठाकरेंचा करारी बाणा सगळ्यांनाच माहिती आहे, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचीही त्यांची स्टाईल आहे, तोच हा फोटो असावा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जेव्हा दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, तेव्हाचा हा फोटो

राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली होती, त्यावेळी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात जातानाचा राज ठाकरेंचा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो

राज ठाकरेंचा चेहरा गंभीर असतो, पण ते जेव्हा हसतात तेव्हा मनमोकळेपणे हसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कार्यकर्त्यांना ऊर्जा अन् बळ देऊन जातं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी मुलाखत घेतली होती, त्यावेळी शरद पवारांचा हात हात घेतलेला हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हा जुना फोटो आहे, या फोटोत दोन्ही राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानावरील खेळाडू असल्याचं दिसून येतंय.

राज ठाकरे जेवढं राजकारणी आहेत, तेवढचे कलाकार, क्रीडाप्रेमीही आहेत. त्यामुळेच, क्रिकटेसोबतच ते टेनीसही खेळतात

टेनिस कोर्टवर राज ठाकरेंचा चहा पितानाचा हा फोटो, त्यांच्या जबरदस्त स्टाईलचा कॅमेऱ्यात कैद झालेला हा फोटो

मनसेच्या कार्यकर्त्यांना अभिवादन करताना राज ठाकरेंची ही स्टाईल नेहमीच शिवसैनिकांना बाळासाहेबांची आठवण करुन देते

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!