'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची वाढवली शोभा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:34 PM2020-01-26T12:34:33+5:302020-01-26T12:58:51+5:30

मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.

कान्होजी आंग्रेंची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी झाला.

महाराष्ट्राचा "कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल" या विषयावरील चित्ररथ राजपथाच्या संचलनात सहभागी झालेला नाही. त्यामुळे या चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची शोभा वाढवली.

एनसीसी आणि एमसीसीच्या विद्यार्थ्यांसह पोलिस खात्याकडूनही पथसंचलन करण्यात आलं.

वन विभागाने देखील पर्यावरणाबाबत माहिती देणारा चित्ररथ सादर केला.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवा असा संदेश देणारा चित्ररथ देखील साकारण्यात आला होता.

महापारेषण नावाने सौर ऊर्जेची माहिती देणारा चित्ररथही उभारण्यात आला होता.

क्रीडा विभागाकडून 'चला मुलींनो खेळूया' असा मुलींना प्रोत्साहन देणारा चित्ररथ देखील साकारण्यात आला होता.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देखील चित्ररथ सादर करण्यात आला.