मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह शिगेला, गिरगावात भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 21:53 IST2017-09-05T21:46:25+5:302017-09-05T21:53:17+5:30

12 दिवस मंडपात भक्तांना आशीर्वाद दिल्यानंतर आता गणपती बाप्पा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाले आहेत

मुंबईतल्या प्रमुख गणेश मंडळांच्या मोठ्या जल्लोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुका गिरगाव चौपाटीवर येऊन थांबल्या आहेत. गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं असून, अनेक गणपती बाप्पा विसर्जनासाठी सज्ज आहेत.

चौपाटीवरही विसर्जनासाठी सज्ज असलेले गणपती डोळ्याचं पारणं फेडत आहेत. जड अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.

गिरगाव चौपाटीवर हजारो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत. अनेकांनी मोबाईलमध्ये गणरायाची छबी टिपण्यासाठी मोबाईल फोन उंचावले आहेत.