ईद मुबारक

By admin | Published: July 18, 2015 12:00 AM2015-07-18T00:00:00+5:302015-07-18T00:00:00+5:30

बेंगळूरमधल्या चामराज इदगाह मैदानात नमाज पढताना मुस्लीम भाविक.

लहान मुलींनीही इस्लाममधल्या पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस ईद साजरी करताना प्रार्थना केली.

पाकिस्तानमधल्या क्वेट्टा येथे मुस्लीम नमाज पढताना सुरक्षेची कामगिरी पार पाडचाना पोलीस.

रमजान बरोबर रोजे संपले आणि सगळ्यांसाठी मौजमजा करायचे पर्व सुरू झाले. पाकिस्तानमधली मुलं ईदीच्या दिवशी उंटावरच्या सफारीचा आनंद घेताना.

सेल्फीचा मोह कुणाला सुटलाय? ईदीच्या दिवशी नमाज पढल्यानंतर सेल्फी काढताना पाकिस्तानमधल्या लाहोरमधलं कुटुंब.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेता अयातुल्ला खामेनी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदीचा नमाज पढण्यात आला. त्याचे खामेनींच्या अधिकृत वेबसाईटने प्रसारीत केलेले दृष्य.

आग्र्याला ताजमहलच्या साक्षीने ईदनिमित्त नमाज पढताना मुस्लीम.

ईदच्या जलश्यामध्ये फुग्याचा मजा घेताना नवी दिल्लीतला लहान मुलगा.

रोजे संपले आणि आता खाण्यापिण्याची चैन सुरू करायचे दिवस सुरू झाले. याची झलक नवी दिल्लीसह भारतातल्या विविध शहरांमध्ये अशी दिसत आहे.

शुक्रवारी चंद्रदर्शन झाले आणि शनिवारी ईद निश्चित झाली. पवित्र महिन्याची सांगता मेंदीच्या माध्यमातून शुभेच्छा देत करणारी फिरोझ जहाँ बेगम ही भारतीय महिला.