रोजगार, शिक्षणाच्या हक्कासाठी डीवायएफआय आणि एसएफआयचे हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:55 IST2018-03-23T15:55:48+5:302018-03-23T15:55:48+5:30

रोजगार, शिक्षणाच्या हक्कासाठी डीवायएफआय आणि एसएफआयने शुक्रवारी मुंबईत हल्लाबोल आंदोलन केले. (छायाचित्रे - सुशील कदम)
या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंदोलकांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडत होती. आंदोलकांनी महानगरपालिका मुख्यालयासमोरील महापालिका मार्ग रोखून धरला होता.
काही आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.
अखेर डीसीपी मनोज शर्मा यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करत आझाद मैदानाकडे मोर्चा वळवला.