भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:59 IST2017-12-06T16:56:47+5:302017-12-06T16:59:56+5:30

भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने दादर स्थानकाचे नामांतर डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे केले.
भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर
दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करत या स्थानकाला `डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस म्हणा' असे संदेश लिहिलेले फलक स्टीकर रेल्वे स्थानकावर लावण्यात आले होते.
भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर
भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि चैत्यभूमीला आलेले भीमसैनिकही दादर स्थानकात लावण्यात आलेल्या या नवीन फलकासोबत सेल्फी काढून घेत होते.
भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर
दादर पूर्वेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे ऐतिहासिक निवासस्थान व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, तर पश्चिमेला दादर चौपाटी येथे चैत्यभूमी आहे .