Coronavirus : देशभरात कोरोनामुळे घबराट, मग मुंबईने कशी थोपवली दुसरी लाट? अतिरिक्त आयुक्तांनी सांगितली नेमकी रणनीती

Published: May 5, 2021 05:46 PM2021-05-05T17:46:53+5:302021-05-05T18:03:07+5:30

Coronavirus in Mumbai : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मात्र परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जिथे मुंबईमध्ये ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडत होते ती संख्या घटून आता तीन हजारांच्या आत आलीआहे.

संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मात्र परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जिथे मुंबईमध्ये ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडत होते ती संख्या घटून आता तीन हजारांच्या आत आली आहे.

देशाच्या इतर भागात चिंताजनक परिस्थितीत असताना मुंबई महानगरपालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेझी ठरत आहेत. मुंबईने कोरोनाच्या या भीषण लाटेला कशाप्रकारे रोखले यामागची रणनीती मुंबईची अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आता स्पष्ट केली आहे.

टेस्टिंग आणि ट्रॅकिंग - Marathi News | टेस्टिंग आणि ट्रॅकिंग | Latest mumbai Photos at Lokmat.com

सुरेश काकाणी यांनी सांगितले की, शॉपिंग मॉल, भाजी मंडई, मच्छी मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणी स्वॅब गोळा करण्यासाठी कियोक्स उभारण्यात आल्या. तसेच बाजारामध्ये खरेदसाठी आलेल्यांची रॅपिड अँटिजन चाचणी करणे सुरू केले. दुकानदार, व्यापाऱ्यांच्या आर-टीपीसीआर चाचण्या केल्या. तसेच ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान तयार केलेल्या अतिरिक्त क्वारेंटाइन सुविधांमुळेही खूप मदत मिळाली.

ऑक्सिजन आणि बेडची पूर्वतयारी - Marathi News | ऑक्सिजन आणि बेडची पूर्वतयारी | Latest mumbai Photos at Lokmat.com

कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यावर ऑक्सिजन सप्लाय सिस्टिम वाढवण्यात आळी होती. तसेच २८ हजार बेड्सपैकी १२-१३ हजार बेडवर ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर आम्ही उपचारांसाठी तयार होतो.

त्याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलेंडरमध्येसुद्धा बदल केले. आधी आम्ही साध्या सिलेंडरवर अवलंबून होतो. मात्र नंतर जंबो सिलेंडरचा वापर केला. त्याची क्षमता साधारण सिलेंडरपेक्षा १० पटीने अधिक होती. तसेच १३ हजार किलोलीटर क्षमतेचे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केले. त्यामुळे रुग्णालये रीफिल मोडवरून स्टोरेज मोडवर आली, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

तसेच पहिल्या लाटेदरम्यान, जे रुटीन सिस्टिम फॉलो करण्यात आले. तेच आम्ही यावेळीही सुरू ठेवले. घरोघरी जाऊन सर्व्हे, कॅम्प लावणे, कोरोनाच्या लक्षणांची ओळख पटवण्यासाठी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांनाही सोबत घेतले. या सर्व बाबी आमच्यासाठी फायदेशीर ठरल्या. तसेच यादरम्यान वॉररूमही तयार करण्यात आले. त्यांना ठराविक सीमाक्षेत्र आखून देण्यात आले. हे वॉर रूम सातत्याने रुग्णांच्या संपर्कात राहत होते.

लॅबमधून रुग्णाला रिपोर्ट मिळण्यापूर्वी त्याबाबतची माहिती पालिकेला देणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे रिपोर्ट मिळाल्यानंतर गरजू रुग्णापर्यंत पोहोचून वॉर रूमची टीम मदत करते.

औषधांचा पुरवठा कमी आहे का? - Marathi News | औषधांचा पुरवठा कमी आहे का? | Latest mumbai Photos at Lokmat.com

याबाबत सुरेश काकाणी म्हणाले की, आम्ही आधीच रेमडेसिविरसारख्या औषधांची टंचाई जाणवू शकते, असा अंदाज बांधला होता. त्यामुळे दोन लाख वायलसाठी टेंडर जारी केले होते. त्यामुळे कुठल्याही सार्वजनिक रुग्णालयात रेमडेसिविरची टंचाई जाणवली नाही. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले, अशी माहितीही काकाणी यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!