CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी

By सायली शिर्के | Published: September 29, 2020 06:06 PM2020-09-29T18:06:00+5:302020-09-29T18:24:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत

महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात सोमवारी (28 सप्टेंबर) कोरोनाचे 11,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 13,51,153 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 35 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,49,947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईतून एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतून सुखावणारी माहिती मिळत आहे.

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत. दिलासादायक म्हणजे मुंबईचा रिकव्हरी रेट हा 82 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

गेल्या दहा दिवसांत 27,219 अधिक लोक हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर सप्टेंबरमध्ये 47,615 लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. कोरोनाच्या लढ्याला यश येत आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून उपचारानंतर ठीक झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दररोज तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांची चाचणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, मास्क, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहेत. खबरदारीचे सर्व उपाय राबवण्यात येत असल्याने कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांपैकी 2,65,033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10,49,947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 61,45,292 वर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70,589 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 776 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 95,542 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात कोरोना कसा पसरला याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT) रिसर्चमधून कोरोनाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतात दुबई आणि इंग्लंडमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे.

आयआयटीने आपल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे. भारतात कोरोना हा आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे देशातील विविध राज्यात पसरल्याचं यामध्ये म्हटलं आहे.