'पैसे खाण्याचं स्कील चंद्रकांत पाटलांकडेच, Phd केली असावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:20 AM2021-09-21T08:20:04+5:302021-09-21T08:25:48+5:30

सामनातून टीका करताना संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाचा समाचार घेतला. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही, असे पाटील यांनी म्हटले होते.

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर, कोल्हापुरात जाऊन या घोटाळ्याची तक्रार देणार असल्याचं सांगत किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेमधून कोल्हापूरला निघाले होते.

पोलिसांनी कराडमध्येच त्यांना स्थानबद्ध केलं. त्यामुळे, सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सहकारसह शरद पवारांवर निशाणा साधला. भाजपा नेत्यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. आता, याबाबत शिवसेनेन मुखपत्रातून आपली भूमिका मांडली आहे.

'ईडी' शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. 'ईडी' मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे .

भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत, असे म्हणत शिवसेनेनं किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेनं घेत नसल्याचं म्हटलं आहे.

सामनातून टीका करताना संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाचा समाचार घेतला. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही, असे पाटील यांनी म्हटले होते.

पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची 'पीएच.डी.' त्यांनी केली असावी. त्यामुळे 'ईडी'ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा, अशी मागणीच राऊत यांनी केली आहे.

स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे.

पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट 'ईडी', 'सीबीआय'च्या धमक्या का देता?

केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच 'झेड' दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते.

सत्य असे आहे की, 'ईडी'मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे.