'चांदनी'च्या एक्झिटनंतर कपूर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सेलिब्रिटींची रीघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 09:49 IST2018-02-26T09:49:15+5:302018-02-26T09:49:15+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी युएईमध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर कालपासून अनिल कपूरच्या जुहू येथील बंगल्यावर सेलिब्रिटींची रीघ लागली आहे. अभिनेत्री रेखा आणि शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम जुहू येथील बंगल्यावर आल्या तेव्हाचे छायाचित्र.

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि वैभवी मर्चंट यादेखील कपूर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अनिल कपूरच्या जुहू येथील बंगल्यावर आल्या होत्या.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अर्जून कपूर आपल्या चित्रपटाचे शुटिंग अर्धवट सोडून मुंबईत आला. त्याच्या 'नमस्ते लंडन' चित्रपटाचे अमृतसर येथे शुटिंग सुरु होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी युएईमध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीतील अनेकांना धक्का बसला. मात्र, या धक्क्यातून सावरत बॉलिवूड सेलिब्रिटी कपूर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पुढे सरसावले

करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा हेदेखी अनिल कपूरच्या घरी आले होते. हे दोघेही श्रीदेवी यांच्यासोबत दुबईत लग्नासाठी गेले होते.

दिग्दर्शक डेव्हिड धवन हेदेखील कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी अनिल कपूरच्या घरी गेले होते.

















