1 / 7देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची लगबग सध्या सुरू आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह उद्योग आणि सिनेक्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 2 / 7मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया येथे हळदी समारंभ झाला. यावेळी मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी त्यांच्या पत्नी टीना अंबानी आणि सून कृषा शाह अंबानी हे उपस्थित होते. 3 / 7 अनंत अंबामी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभानंतर अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी अँटिलिया येथून बाहेर जाताना माध्यमांना पोझ दिल्या. तेव्हा ते हळदीमध्ये रंगलेले दिसले. 4 / 7बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हासुद्धा हळदी सोहळ्यामध्ये धमाल मस्ती करताना दिसला. तोसुद्धा हळदीमध्ये रंगलेला होता. त्यामुळे केवळ अंबानीच नाही तर हळदी समारंभाला आलेल्या पाहुण्यांनीही खूप मौजमजा केल्याचं समोर आलं आहे. 5 / 7यादरम्यान, रणवीर सिंह याने ऑरेंज कलरचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केलेला होता. तसेच हळदी समारंभा आटोपून रणवीर सिंह घरी जात असताना त्याचा कुर्ता फाटलेला दिसला. 6 / 7अंबानी कुटुंबीय आणि बॉलिवूड कलाकारांसोबत उद्धव ठाकरे हेसुद्धा कुटुंबीयांसह हळदी समारंभामध्ये सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हेसुद्धा होते. तसेच तेजस ठाकरे यांनी हळदी समारंभात केलेला डान्स चर्चेचा विषय ठरला आहे. 7 / 7सलमान खानने हळदी समारंभामध्ये काळ्या रंगाचा पठाणी सूट परिधान करून प्रवेश केला होता. मात्र नंतर त्याने रणवीर सिंह प्रमाणे ऑरेंज कलरचा कुर्ता परिधान केला. पण संपूर्ण हळदी सोहळ्यादरम्यान, सलमान खानला हळद लागलेली दिसली नाही.