२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:00 IST2025-07-26T12:51:31+5:302025-07-26T13:00:20+5:30
२६ जुलै २००५ चा दिवस मुंबईकरांच्या कायमच आठवणीत राहिला आहे. त्या वर्षी उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.

मुंबईसह उपनगरांमध्ये २६ जुलै २००५ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. एकट्या सांताक्रुझच्या हवामान केंद्रात चोविस तासांत ९४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
त्यावेळी मुंबईसह मिरा भाईंदर-कल्याण, अंबरनाथ-बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
या पावसात ४०० हून अधिकांचा मृत्यू झाला होता तर हजारो वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. तर १४,००० हून अधिक घरांचंही नुकसान झालं होतं.
२६ जुलै २००५ च्या महापुराला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते.
मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. साचल्या पाण्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती.
या दिवशी अनेकांचा मृत्यू झाला होता तर ५०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झाले होते.
दरम्यान, या घटनेला इतकी वर्षे उलटूनही महापालिकेनं अजून पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी आजही पाणी साठते.