Join us
Daily Top 2Weekly Top 5

"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:37 IST

सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई- सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाचे या अगोदरचे दोन पर्व चांगलेच गाजले होते. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रमच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या कार्यक्रमाची सुरूवातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीने होणार आहे. या मुलाखतीतील प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. 

मुलाखतीवेळी राज ठाकरे (Raj Thackeray) उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो पाहून भावुक झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.  

मंदिरांवरील हल्ला मान्य नाही, कठोर पावले उचलण्याचे पंतप्रधान अल्बानीजचे आश्वासन; पीएम मोदी ऑस्ट्रेलियात म्हणाले...

या मुलाखतीवेळी अवधुत गुप्ते राज ठाकरे यांना काही जुने फोटो दाखवतानाचे दिसत आहे. या फोटोंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे दिसत आहेत. हे फोटो दाखवून अवधुत गुप्ते राज ठाकरेंना विचारतात काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून? यावर राज ठाकरे म्हणतात, खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला, कोणीतरी विष कालवलं की नजर लावली." हे उत्तर देताना राज ठाकरे भावुक झाल्याचे दिसत आहे. यानंतर अवधुत गुप्ते म्हणाला, परत येऊ नाही शकणार.. झी मराठी वाहिनेने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

गेल्या काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता या प्रोमोमुळे चर्चा सुरू आहे. या पोस्टला अनेकांनी कमेंट करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी केली आहे, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले महाराष्ट्र याच वेळेची वाट पाहत आहे असं लिहिले आहे.   

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमनसेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे