चहामध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 03:30 IST2019-07-30T03:30:10+5:302019-07-30T03:30:13+5:30

नीता (नावात बदल) ही एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.परवेझ उर्फ सुरज पांडे नामक इसमाशी तिची मैत्री झाली

Young woman raped by drug addict in tea | चहामध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

चहामध्ये गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

मुंबई : रिसॉर्टमध्ये नेऊन चहात गुंगीचे औषध घालून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी गोराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

नीता (नावात बदल) ही एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.परवेझ उर्फ सुरज पांडे नामक इसमाशी तिची मैत्री झाली. तो गोरेगाव परिसरात राहत होता. त्याने नीताला लग्नाचा प्रस्ताव दिला, मात्र तिने त्याला नकार दिला. एक दिवस पांडेने तिला मालाडच्या मनोरी परिसरात रिसॉर्टवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला पांडेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली देत लग्नाचे वचन दिले. यादरम्यान त्याने नीताचे डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरत जवळपास १० लाख ३६ हजार लुबाडले. याप्रकरणी तिने गुन्हा दाखल केला.
 

Web Title: Young woman raped by drug addict in tea